शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

By अनंत खं.जाधव | Updated: June 5, 2024 17:07 IST

सावंतवाडी शहरात कमी मताधिक्य मिळाले याबाबतची कारणमीमांसा करणार

सावंतवाडी : कोकणी जनतेला पुन्हा एकदा हक्काचा खासदार मिळाला असून त्यामुळे कोकणाचा विकास झपाट्याने होणार आहे. अनेक कंपन्या येणार असून त्यातून रोजगाराचा प्रश्न सुटेल असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला. ते बुधवारी सावंतवाडीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरात कमी मताधिक्य मिळाले याबाबतची कारणमीमांसा करणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी परब म्हणाले, कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या काळात उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल यावीत आणि येथील युवकांना स्थानिक स्तरावर युवकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही राणेंना गळ घालणार आहोत.अनेक वर्षे रोजगाराबाबत काय होत नाही पण आता भविष्यात असे दिवस राहणार नसून नक्कीच रोजगाराचा प्रश्न सुटेल असेही परब यावेळी म्हणाले.तसेच राणेंच्या रुपाने पुन्हा एकदा कोकणाला हक्काचा खासदार मिळाला आहे. या ठिकाणी आता कोकणचा विकास झपाट्याने होणार आहे. गेल्या १० वर्षात असलेला विकासाचा “बॅकलॉग” भरुन निघणार आहे. मागील दहा वर्षांत कोकणचा आवाज संसदेत दिसला नाही पण आता कोकणचा आवाज संसदेत दिसेल राणे यांचे कर्तृत्व मोठे आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात येथील जनतेच्या भल्यासाठी मोठ-मोठे उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी आणावेत, अशी गळ त्यांना घालण्यात येणार आहे. यावेळी त्यांंनी राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार्‍या मतदारांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले.काही ठिकाणी मते कमी-जास्त मिळाली. मात्र यावर चर्चा करणार नाही तर त्या ठिकाणी नेमकी नाराजी काय? याचा शोध घेतला जाणार आहे आणि यापुढे मताचा आकडा वाढावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत, असे ते म्हणाले.राणे यांच्या विजयाचे शिल्पकार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आहेत. सर्वांनी एकत्र काम केल्यामुळे आम्ही हे यश गाठू शकलो, असा दावा त्यांनी केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल