शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

येत्या पाच वर्षांत कोकणचा कायापालट

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

अनंत गीते : करंजाणी येथील नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी घोषणा

दापोली : येत्या पाच वर्र्षात आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणाच्या आर्थिक विकासाकरिता आवश्यक असणारे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व जलमार्ग यांचे जाळे तयार करणार असून, यानंतर कोकणाचा वेगाने अर्थिक विकास होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केली. तालुक्यातील करंजाणी येथील ग्रामपंचायत कार्यालय व श्री शिवाजी हायस्कूल, करंजाणी नूतन इमारत भूमिपूजन सोहळा अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे उपस्थित होते. कोकणच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा झाली असून, आपणाला योग्य जागा उपलब्ध झाली की, तत्काळ या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे दापोलीला वेगळी ओळख निर्माण होईल. विनाअनुदानित शाळांना खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देता येत नव्हता. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना आपण याबाबत विशेष प्रयत्न करून विनाअनुदानित शाळांकरिताही त्यांना अधिक गरज असल्याने खासदार निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सध्याचे शिक्षण हे रोजगाराभिमुख असावे. ग्रामीण भागात असणाऱ्या कौशल्यांना मान्यता व प्रतिष्ठा मिळायला हवी. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलेपमेंट मंत्रालय सुरू केले आहे. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. खेडोपाडी शिक्षणाचे कार्य करणाऱ्या सर्वच शिक्षण संस्थांना आपले नेहमीच सहकार्य होत आले असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्र्रमुख शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, उपसभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी गोलांबडे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, उपसंघटक चंद्रकांत शिगवण, पंचायत समिती सदस्य श्रीपत पवार, रत्नागिरी जिल्हा नियोजन सदस्य विनायक गायकवाड, उपविभागप्रमुख सुभाष कांगणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दापोलीत मेरिटाईम विद्यापीठ होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अवजड व उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी केली. यामुळे दापोलीचे महत्त्व अधिक वाढणार असून, दापोली हे महाराष्ट्रातील परिपूर्ण शिक्षण केंद्र म्हणून भविष्यात ओळखले जाईल.खेडचा नाच्या पोर : सूर्यकांत दळवीसूर्यकांत दळवी यांनी आमदार संजय कदम यांच्यावर ‘खेडचा नाच्या पोर’ म्हणून सडकून टीका केली. त्याचा पगार किती व तो बोलतो किती ? त्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आता खालसा झाली असून, युती शासनाची सत्ता आली आहे. तरीही तो भूमिपूजनांचे नारळ फोडत सुटला आहे. आयजीच्या जिवावर बायजी उदार... अशी त्याची गत झाली असल्याचे ते म्हणाले.