शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:39 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्याप्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय 

कणकवली : प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या 'समर स्पेशल ' गाड्यांमध्ये (०१०५१/५२ )ही गाडी १७ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजता २० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २४ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.दुसरी गाडी(०१०१६/१५) करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १८ मे ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी करमाळीहून दर शनिवारी १२.५०वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.तिसरी विशेष गाडी (०१०४५/४६) १२ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता ती गोवा- करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून दर शुक्रवारी दुपरी १२.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ती लोकमान्य टर्मिनसला पोहोचेल.चौथी विशेष गाडी(०१०३७/३८) ही ८ एप्रिल ते ३जून २०१९ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. ही गााडी दर सोमवारी रात्री १ वाजता १०मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी ती १ वाजता २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. सतरा डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, या समर स्पेशल जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्टी साठी गावी येणाऱ्या मुंबईकर मंडळींना गर्दीच्या हंगामात त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग