शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे सेवा विस्कळीत, कणकवलीत कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:42 IST

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. पेण येथील दुष्मी रेल्वे गेट परिसरात भू:स्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला होता. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देकोकण रेल्वे सेवा विस्कळीतकणकवलीत कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबविली

कणकवली : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. पेण येथील दुष्मी रेल्वे गेट परिसरात भू:स्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला होता. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.कोकणात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना बसला. त्यामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १२ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. गोव्याहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस कुडाळ येथे थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कंटाळलेल्या प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे काही वेळ तेथील वातावरण तंग बनले होते. त्यानंतर ती गाडी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.करमाळी सीएसटी एक्स्प्रेस ओरोस येथे थांबवून ठेवण्यात आली होती. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. मडगाव निजामुद्दीन एक्स्प्रेस वैभववाडी येथे तर तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडीत थांबविण्यात आली होती.दादर रत्नागिरी, पुणे एर्नाकुलम, दिवा सावंतवाडी या गाड्यांही रद्द करण्यात आल्या होत्या. तर हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस व हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस या दोन गाड्या दुसºया मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या.रत्नागिरी-दादर रोहा पर्यंत तर सावंतवाडी-दिवा ही गाडी रत्नागिरीपर्यंत सोडण्यात आली होती. दरम्यान, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी गाड्यांबाबत ह्यअपडेटह्ण देण्यात येत होते. मात्र, नियोजित प्रवास करता न आल्याने प्रवासी पुढे काय करायचे या विचाराने गोंधळलेले होते. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग