शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

कोळकेवाडी कार्यालयाचे स्थलांतर?

By admin | Updated: February 13, 2015 22:55 IST

स्थानिकात खळबळ : शासनाने पाठपुरावा करणारी समिती स्थापन

शिरगाव : महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी कोयना नदीची महती सांगत कोयना जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. धर पायथा वीजगृह वगळता पोफळी, कोळकेवाडी येथे ७५ टक्के कामे रत्नागिरी जिल्ह्याातील चिपळूण तालुक्यात सुरु असताना, जलसंपदा खात्याकडून वीजनिर्मिती वगळता इतर शासकीय कार्यालये बिनकामाची ठरवण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेले कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाच बंद करुन माणगाव जिल्हा रायगड येथे नेण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याच्या वृत्ताने अलोरेत खळबळ उडाली आहे.१९६७ साली तत्कालीन पाटबंधारे खात्याकडून स्थापत्य, विद्यत व यांत्रिकी विभागाची कार्यालय सुरु झाले. जलविद्युत प्रकल्पासाठी वीजगृह उभारणी, धरण व्यवस्थापन व वसाहत दुरूस्ती व वीज पुरवठा याबरोबरच कोकणचे यांत्रिकी विभागीय अर्थशास्त्र अलोरेत आज सुरु आहेत. कोयना प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प असल्याने आजपर्यंत इथे विविध उपविभाग कार्यरत आहेत.सद्यस्थितीत येथील मनुष्यबळ अन्यत्र हलवल्यास २५० कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. मुबलक पाणी, वसाहत अंतर्गत रस्ते, पथदीप, बाजारपेठ, शाळा, पोष्ट, बँका या मुलभूत सुविधा असलेले अलोरे गावातील प्रकल्पग्रस्तांचे उद्योगधंदे अडचणीत येऊ शकतात अशी स्थिती आहे. जलसंपदा खात्याचा प्रस्तावित नांदिवसे-स्वयंदेव येथील प्रकल्पाचे काम या विभागाकडून होऊ शकते. पायाभूत सुविधा असलेल्या शासन संपादित जमिनीत शासन अन्य कोणताही उद्योग येथे आणू शकते. अतिवृष्टीमुळे कुंभार्ली-नवजाघाट बंद असताना, येथे राहणारे मनुष्यबळ महत्वाचे ठरते. अशा अनेक मुद्यांवर वेगाने चर्चा घडू लागल्या आहेत. सिंधुदुर्गातील आरोस नगरीप्रमाणे अलोरेत शासकीय यंत्रणा उभी राहू शकते. या अनुषंगाने स्थानिक मडळींनी चर्चेतून प्रशासकीय स्तरावर या धोरणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची मांडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.कोळकेवाडी नागावे-अलोरे-पेढांबे, पोफळी-कोंडफणसवणे गावातील शासकीय स्थानिक कर्मचाऱ्यांनाही उतारवयात त्रासदायक ठरणारा शासन निर्णय रद्द व्हावा व इथेच अधिक काम द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.पन्नास वर्षानंतर आलेल्या या धक्कादायक बातमीमुळे समांतर समस्या केंद्रस्थानी सर्वपक्षीय क्रीयाशील कार्यकर्ते एकवटले आहेत. प्रकल्प बचाव कृतीसमिती स्थापित करून प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याच्यादृष्टीने एकमताने पेढांबेतील प्रताप शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत विनो झगडे, रमेश राणे, मयूर खेतले, सुर्यकांत खेतले, घनश्याम पालांडे, प्रकाश मोहिते, चंद्रकांत राणे, रमेश बंगाल यांचा समितीत समावेश आहे. प्राथमिक सभेला ४० स्थानिक मंडळी उपस्थित होती. या सर्व विषयाकडे अधिक गांभिर्याने पहावे लागेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कोळकेवाडी विभाग बंद करून, तो माणगावला जोडल्याचे वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)