शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोलगाव दरवाजा इतिहासजमा होतोय

By admin | Updated: April 2, 2015 01:27 IST

वास्तूची पडझड : प्रशासनाचे दुर्लक्ष, इमारतीच्या कामासाठी पंधरा लाखांची तरतूद

प्रसन्न राणे - सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील ऐतिहासिक वारशाची आठवण करुन देणारा, इतिहासाची साक्ष देणारा कोलगाव दरवाजा हा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. कोलगाव दरवाजाचे छप्पर मोडकळीस आले असून सौंदर्यही लोप पावत आहे. कोकण विकास पॅकेज अंतर्गत १५ लाख रुपयांची तदतूद २००४ साली करण्यात आली होती. मात्र, या इमारतीचे काम ठप्प झाले आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पर्यटनदृष्ट्या आकर्षक ठरणारा हा ऐतिहासिक वारसा जपणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पर्यटनदृष्ट्या सावंतवाडीच्या विकासाला चालनाही मिळू शकते. कोलगाव दरवाजा या ऐतिहासिक वास्तूचे काम २००४ साली १५ लाख रुपये खर्ची घालून करण्यात आले होते. यावेळी चित्रांच्या माध्यमातून सावंतवाडी संस्थानाचा इतिहास पर्यटकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसत आहे. या वास्तूमध्ये त्यावेळी येणाऱ्या पर्यटकांना छायाचित्रे पाहण्याकरिता अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आतमध्ये एअर कंडिशन लावण्यात आले होते. कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आकर्षक छायाचित्रे दादा मालवणकर व आनंद ठोंबरे यांनी या वास्तूमध्ये लावली आहेत. अनेक सोयीसुविधा इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु आता या वास्तूकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोलगाव दरवाजा वास्तूतील छप्पर मोडकळीस आले असून अनेक पावसाळे या इमारतीने झेलले आहेत. पावसामुळे इमारतीत पाणी घुसून आतील सर्व छायाचित्रे भिजून सर्व वाया गेली आहेत. तर आत करण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांचा चक्काचूर झाला आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या पुरातन वास्तूची पडझड थांबविणे कठीण आहे....तर पर्यटनदृष्ट्या चालना मिळेलमुंबई - गोवा महामार्गानजीक कोलगाव दरवाजाची ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे. अनेक पर्यटकांनी या वास्तूला भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, इमारतीला धोका उत्पन्न झाल्यापासून इमारतीमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक निराश होऊन माघारी परतले आहेत. कोकण विकास पॅकेज अंतर्गत या इमारतीवर खर्चही करण्यात आला आहे. मात्र, आता या वास्तूकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या वास्तूकडे लक्ष देत वास्तूची दुरुस्ती करून पुन्हा एकदा चालू करावी. जेणेकरून पर्यटनदृष्ट्या त्या भागात विकासाला चालना मिळेल. सावंतवाडी शहराचाही पर्यटनदृष्ट्या कायापालट होईल. शासनाला ऐतिहासिक वास्तूंची किंमत नाहीसावंतवाडी शहराच्या इतिहासाची पर्यटकांना ओळख व्हावी यासाठी सावंतवाडी शहरवासीयांच्या प्रेमापोटी अत्यंत कमी मोबदल्यात कोलगाव दरवाजा वास्तूसाठी अनेक संस्थानकालीन चित्रे तयार करून दिली होती. मात्र, कमी किमतीने दिलेल्या चित्रांची किंमत प्रशासनाला नसल्याने याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधींचा सर्व पैसा वाया घालविण्याचे काम प्रशासनाने केले आहे. ही इमारत दुरुस्त झाल्यास पर्यटकांना आकर्षक अशी संस्थानकालीन छायाचित्रे कोलगाव दरवाजाच्या वास्तूत लावल्यानंतर पाहता आली असती. मात्र, त्या छायाचित्रांची आणि कोलगाव दरवाजाच्या वास्तूची देखभाल प्रशासनाला करता आली नाही, हे दुर्दैव आहे. - आनंद ठोंबरे,ज्येष्ठ चित्रकार, सावंतवाडीराजघराण्याचा इतिहास चित्रप्रदर्शनाद्वारे या वास्तूमधून दाखविला जात होता. आता या इमारतीची दुरवस्था झाली असल्याने इतिहासाची ओळख हरवत चालली आहे. कोलगाव दरवाजाची दुरुस्ती होऊन पुन्हा चित्रप्रदर्शने घेणे अत्यंत आवश्यक आहे. या वास्तूच्या इमारतीतूनच संपूर्ण सावंतवाडीचा इतिहास दर्शविला जात आहे. - दादा मालवणकर,ज्येष्ठ चित्रकार सावंतवाडीहा सावंतवाडीतील ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. कोलगाव दरवाजाच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आतील सामानाचीही दुरुस्ती करून लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. जेणेकरून सावंतवाडीचा इतिहास कायमस्वरूपी तेवत राहिल.- बबन साळगावकर,नगराध्यक्ष, सावंतवाडी