शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अपक्षांमुळे ‘काँटे की टक्कर’

By admin | Updated: November 16, 2016 22:31 IST

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग पाचमध्ये दोन जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात

सावंतवाडी : येथील प्रभाग पाचवर संपूर्ण सावंतवाडीचेच लक्ष लागून राहिले असून, या प्रभागातून दोन जागांसाठी १३ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत. यातील अपक्षांची संख्या मोठी असल्याने सध्या या प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनविला असल्याने प्रत्येक पक्षाची डोकेदुखीही वाढली आहे. सावंतवाडीतील प्रभाग पाचमध्ये उभा बाजार, जुना बाजारपासून सालईवाड्याचा काही भाग कंटक पाणंद असा शहरी भाग येतो. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग लहान असला, तरी उच्चशिक्षित मतदारच या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी उच्चशिक्षित आणि ज्यांचा मतदारांवर प्रभाव पडेल, असेच उमेदवार येथे उभे केले आहेत. या प्रभागातून भाजपने पूजा पोकळे व उमेश कोरगावकर यांना, तर शिवसेनेने कीर्ती बोंद्रे व शिवप्रसाद ऊर्फ मुन्ना कोरगावकर यांना संधी दिली आहे. काँग्रेसने पल्लवी रेगे व सुधीर आडिवरेकर यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. अपक्ष म्हणून सीमा मठकर, साक्षी वंजारी, अन्नपूर्णा कोरगावकर, वैष्णवी ठोंबरे या स्त्री उमेदवारांबरोबरच पुरुष उमेदवारांतून गुरुदत्त गवंडळकर, अरुण भिसे, परीक्षित मांजरेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग पाचमध्ये पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व राहिले. त्यामुळे शिवसेनेतून अनेकजण इच्छुक होते. मात्र, अंतिम क्षणी मुन्ना कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्यासोबत विद्यमान नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने या प्रभागातून माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांना संधी दिली आहे. तसेच या प्रभागातून पूजा पोकळे या नवख्या उमेदवार निवडणूक लढवित आहेत. भाजपने पोकळे यांचे घराणे या प्रभागात मोठे असल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप पक्ष या प्रभागात चर्चेत आला आहे. काँग्रेसने शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर व पल्लवी रेगे यांना संधी दिली आहे. आडिवरेकर यांचा प्रभाव हा जुना बाजारभागामध्ये मोठा आहे. दोघेही नवखे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, तर शिवसेनेनेही मुन्ना कोरगावकर यांना नव्याने संधी दिली आहे. उमेश कोरगावकर यांचाही उभाबाजारमध्ये चांगला लोकसंपर्क आहे. मात्र, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अरुण भिसे यांनी याच प्रभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांना अचानक भाजपने डावलल्याने त्यांनीही बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांना मतदारांची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागातून गुरुदत्त गवंडळकर व सीमा मठकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने सर्वच पक्षांना हे अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरणार आहेत. मात्र, पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांबराबरच अपक्ष उमेदवारांनी प्रत्येक घरोघरी प्रचार सुरू केला असून, आपणास मिळणाऱ्या मतांचे आडाखे बांधत आपलाच विजय असल्याचे सर्वजण सांगत आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत या प्रभागात कोण जास्त प्रचारावर भर देतो व छुपे आडाखे बांधतो, त्यावरच उमेदवारांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी) अपक्षांचा परिसरात चांगला जनसंपर्क या प्रभागात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. अनेक उमेदवार हे पक्षाचे काम करूनही डावलल्याची तक्रार करीत उभे राहिले आहेत. अपक्षांचा त्यांच्या परिसरात चांगला जनसंपर्क असल्याने प्रत्येक उमेदवाराला ती डोकेदुखी ठरणारी आहे. या प्रभागावर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यातच या प्रभागात अपक्षांसारखीच नाराजांची संख्या जास्त असल्याने नाराज कोणाला मदत करणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.