शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाटचा वारसा जपणारा 'किऱ्याचा आंबा' होणार जमीनदोस्त; विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास नको, ग्रामस्थांचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:45 IST

वर्षानुवर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच कित्येक आठवणींचा वारसा लाभलेले भले मोठे आंब्याचे झाड रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली लवकरच तोडले जाणार आहे. हे झाड किऱ्याचा आंबा तथा किरमँगो वृक्ष म्हणून प्रसिद्ध असून, त्याच्या समोरील पटांगण किरमँगो स्टेडियम म्हणून क्रीडाप्रेमींमध्ये सर्वश्रुत आहे.

याच पटांगणाचा साक्षीदार असलेल्या या वृक्षाने या मैदानावर गेली दोन-तीन पिढ्यांमधील खेळाडूंना बागडताना - खेळताना पाहिले आहे, तर शेकडो पक्षी, पादचाऱ्यांना आसरा दिला आहे. रस्ता रुंदीकरणात हे झाड लवकरच शहीद होणार असल्याचे समजते. त्यामुळे फोंडावासीयांनी आपल्या भावना व्यक्त केली असून, आठवणींचा वारसा लाभलेल्या या झाडासाठी मानवाच्या बुद्धीला अखेरची साद घालत निसर्ग भकास करून विकास नको? अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.महाराष्ट्र झाड संरक्षण आणि जतन कायदा २०२१ प्रमाणे महाराष्ट्र सरकारने ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या झाडांना वारसा वृक्ष-हेरिटेज ट्री म्हणून दर्जा दिला आहे. अशा झाडांची कत्तल करणे हा गंभीर गुन्हा असून, त्यासाठी कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाईची तरतूद केली आहे. मात्र, झाडे तोडणारा ठेकेदार सरसकट सगळी झाडे कापत चालला आहे. या गोष्टीची ठेकेदाराने दखल घेणे अत्यावश्यक आहे.नांदगाव ते फोंडा तिठा आणि घाट रस्त्याच्या कडेला असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे वड, पिंपळ, आंबा अशी मोठमोठी झाडे तोडून, कापून त्याची ठेकेदाराने विल्हेवाट लावली आहे, तर झाडांची फांद्या, पाने लगतच्या कब्जेदाराच्या जागेत टाकली आहेत. त्यांना त्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे. विकासाच्या उंबरठ्यावर जिल्ह्याच्या वेशीवरील फोंडाघाट हे गाव आहे. गेल्या वर्षीच बाजारपेठेतील गटार आणि पादचारी पथ यांच्या माध्यमातून सुमारे एक कोटी ७७ लाखांचा विकास ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर, चालू वर्षी या देवगड ते हैदराबाद महामार्गाचा हजारो कोटी रुपयांच्या विकासाचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे.वर्षानुवर्षापूर्वीच्या झाडांची कत्तलनिखिल कन्स्ट्रक्शनचे कुर्मगतीने चाललेले रस्ता रुंदीकरण, गटार कामे सुरू आहेत. रस्त्यालगतच्या वर्षानुवर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल पोटठेकेदाराकडून सुरू आहे. याची दखल वरिष्ठ पातळीवरून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घेतली जाणे गरजेचे आहे, तशी जनतेची मागणी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : FondaGhat's Heritage 'Kirya Mango' to be Razed; Residents Oppose Development.

Web Summary : FondaGhat's historic mango tree, a local landmark, faces destruction due to road widening. Villagers protest, prioritizing heritage over development, citing environmental concerns and existing tree protection laws. Locals demand intervention against reckless tree felling.