शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: April 29, 2023 17:16 IST

संस्कृती संवर्धन मंच कणकवलीच्या कीर्तन महोत्सवाचे शानदार उद्घाटन 

कणकवली: सध्याच्या सोशल मीडिया, युट्युबच्या जमान्यात वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण सगळी माध्यमे वापरतो. पण आजही छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा असेल, तर जनप्रबोधनासाठी कीर्तन हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. शिवरायांचा खरा इतिहास हा प्रत्येक पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि समजलाच पाहिजे. काहीजण इतिहासाच्या निमित्ताने चुकीची माहिती मांडतात. काहीजण बोलतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. तर कोण अफजल खान, औरंगजेब यांच्या विचारांचा उदोउदो करत आहेत. या हिंदू विरोधी विचारांना मोठ करण्याचे काम काहींजणाकडून चालू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये व वातावरणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय घराघरात पोचविण्याचा उपक्रम महत्वाचा आहे असेही ते म्हणाले. संस्कृती संवर्धन मंच, कणकवलीच्यावतीने विद्यामंदिर हायस्कुलच्या मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प.चारुदत्त आफळे बुवा हे कीर्तन करणार आहेत. त्यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, भाजपा जिल्हा सचिव मनोज रावराणे, संस्कृती संवर्धन मंच अध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणे म्हणाले, शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा म्हणून मला खऱ्या अर्थाने आज समाधान वाटत आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये तसेच माझ्या कणकवलीमध्ये कीर्तन महोत्सव होतोय. तोही छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आहे. हे आमचे भाग्य आहे.  याचा फायदा भावी पिढीला निश्चित होणार आहे असा विश्वास व्यक्त केला

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग