शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शाहूकाल

By admin | Published: January 13, 2016 12:00 AM

स्वाभिमान दिवस साजरा : अटकेपार झेंडे लावणाऱ्या शाहूंच्या इतिहासाचे विस्मरण नको; शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : ‘शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने गेली तीन वर्षे अजिंक्यतारा किल्ल्यावर होत असलेला सातारा स्वाभिमान दिवसाला प्रतिवर्षी प्रतिसाद वाढतो, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात स्वाभिमान दिवस हा संपूर्ण साताऱ्याचा महोत्सव व्हावा,’ अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्ती केली.शिवराज्याभिषक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने अजिंक्यताऱ्यावर आयोजित चौथ्या ‘सातारा स्वाभिमान दिवस’ या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. संभाजीराव पाटणे, नगराध्यक्ष विजय बडेकर, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, डॉ. अविनाश पोळ, सागर राजेमहाडिक, सुहास राजेशिर्के, इतिहास अभ्यासक अजय जाधवराव, माजी अभिरक्षक भास्कर मेंहदळे, म् श्रीकांत आंबेकर, डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, उदय गुजर, भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर, रिपाइंचे किशोर गालफाडे, सूर्यकांत पडवळ, कन्हय्यालाल राजपुरोहित, संयोजक सुदाम गायकवाड उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘अटकेपार स्वराज नेणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास नव्या पिढीला अजिबात माहीत नसणे, हे दुर्दैवी आहे. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून संजयलीला भन्साळी या दिग्दर्शकाने प्रथमच शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने जगभर पोहोचविले; मात्र ही बाब सातारकरांपैकी कोणीतरी करावयास हवी होती, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वाभिमान दिवसाच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या इतिहासाला उजळणी मिळत आहे. ही चांगली घटना आहे. पुढील वर्षी स्वाभिमान दिवस यापेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा होईल आणि त्याला सातारकर निश्चितच साथ देतील,’ अशी आशा व्यक्त केली.प्रा. संभाजीराव पाटणे यांनी ‘राजसदर आणि शाहू महाराज’ या विषयावर बोलताना संपूर्ण मराठेशाहीचा पटच इतिहासप्रेमींसमोर उलघडला. अत्यंत ओघवत्या शैलीत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास सांगताना प्रा. पाटणे म्हणाले, ‘साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याचे भाग्य थोर असून, युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे या किल्ल्यावर तब्बल ५६ दिवस वास्तव्यास होते. दरम्यान, १९४७ मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आजोबा छत्रपती शाहू महाराज यांनी तख्ताचा वाड्यात छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा संगमरवरी पुतळा बसवण्यात यावा, अशी इच्छा औंध संस्थानला लिहिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केल्याची आठवण पाटणे यांनी सांगितली. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची भेटही याच ठिकाणी झाल्याचे ते म्हणाले.गडवाटचे अजय जाधवराव यांनीही यावेळी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहास कथन करताना जगभरात केवळ छत्रपती शाहू महाराज हे असे एकमेव राजे आहेत, त्यांनी आपला बालपणीचा काळ कैदेत घालवला तर त्यानंतरच्या काळात त्यांनी सुमारे ४२ वर्षे खंडप्राय अशा भारत देशावर राज्य केल्याचे नमूद केले. आज पुणे येथे शाहू महाराजांच्या कालखंडातील न वाचलेली तब्बल कोटी कागदपत्रे तशीच असून, त्याचे वाचन झाल्यास शाहू महाराजांचा आणि पर्यायाने मराठेशाहीचा नवा इतिहास जगासमोर येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात संयोजन समितीचे दीपक प्रभावळकर यांनी केले. प्रारंभी आ. शिवेंद्रसिंहराजे, प्रा. संभाजीराव पाटणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही अभिवादन केले. कार्र्यक्रमास अप्पा पोरे, विशाल गायकवाड, गणेश विभूते, रणजित काळे, अतुल साळुंखे, महेश पाटील, आकाश गायकवाड, रोहन घोरपडे, महेंद्र जाधव, विश्वास कोठावळे, स्मितल प्रभावळकर उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)नगर पालिका करणार सहकार्यशिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘स्वाभिमान दिवस दुर्ग संमेलन संयोजन समितीच साजरा करेल. या सर्व कार्यक्रमाला पालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील. हा कार्यकम खऱ्या अर्थाने सर्व सातारकरांनी साजरा करावयास हवा, असा वेगळेपणा जपणारा कार्यक्रम भविष्यात मोठा व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली...आणि जुनी घराणी भेटली या कार्यकमाला संयोजकांच्या वतीने मूळ सातारकर असलेल्या घराण्यातील व्यक्तींना खास आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये राजेमहाडिक, राजेशिर्के, घोरपडे, जाधवराव, कोठावळे, शिकलगार या शाहूकालीन घराण्याचे सध्याचे वंशज उपस्थित होते. साताऱ्यात राहूनही अनेक वर्षे एकमेकांना न भेटलेल्या या घराण्यातील व्यक्तींना एकमेकांची विचारपूस करत गळाभेट घेतल्याचे दुर्मीळ क्षण राजसदरेने अनुभवले.ड्रोन कॅमेरा ठरले आकर्षणया संपूर्ण कार्यकमाला ज्या उत्साहाने सातारकर उपस्थित होते, तो उत्साह निश्चितच कौतुकास्पद होता. विशेष म्हणजे, प्रथमच या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. हेलिकॉप्टरचे फिलिंग देणारा हा ड्रोन कॅमेरा कधी आकाशात उंच तर कधी उपस्थितांच्या डोक्यावरून काही फूट अंतरावर या संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण करत होते.राजसदरेचे पालटले रूप ज्या राजसदरेने एकेकाळी वैभवाचा काळ भोगला ती राजसदर सध्या दुर्लक्षित झाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कित्येक वर्षांनंतर याठिकाणी सकाळी-सकाळी सनई चौघड्यांचे मंजूळ स्वर निनादात होते, तर संपूर्ण परिसराची यानिमित्ताने केलेली स्वच्छता नजरेत भरत होती. राजसदरेला फुलांच्या माळांनी सजवल्याने या कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली. दरम्यान, संयोजकांनी केवळ राजसदरेलाच नव्हे, तर किल्ल्याच्या महाद्वाराला तोरण बांधले.