शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: झोळंबेत आढळला किंग कोब्रा, सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्याची राज्यातील दुसरी घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 18, 2024 18:54 IST

वझरे येथे सर्वप्रथम हा साप पकडण्यात आला होता

वैभव साळकरदोडामार्ग : झोळंबे येथे किंग कोब्रा पकडून त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. महाराष्ट्रात किंग कोब्रा पकडण्याची सरकारदरबारी झालेली ही दुसरी नोंद असून, यापूर्वीही तालुक्यातीलच वझरे येथे सर्वप्रथम हा साप पकडण्यात आला होता.किंग कोब्रा (नागराज) हा साप विषारी असून, तो लांबीने साधारण २० फुटांपेक्षा अधिक वाढतो. पश्चिम घाटामधील ''किंग कोब्रा''च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ''किंग कोब्रा''च्या नोंदी आहेत. बुधवारी सकाळी झोळंबे गावातील सतीश कामत यांच्या मालकीच्या बागायतीत 'किंग कोब्रा'चे दर्शन घडले. येथील एका झाडावर हा ''किंग कोब्रा'' बसला होता. कामत यांनी यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांना दिली. भिसे यांनी वन विभागाला कळवून या सापाचे बचाव कार्य करण्यास सांगितले.

अमृत सिंग यांच्याकडून सापाचे काळजीपूर्वक रेस्क्यूयाची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सावंतवाडी वन विभागाच्या फिरत्या पथकाचे अधिकारी मदन क्षीरसागर व त्यांची टीम दुपारी घटनास्थळी दाखल झाली. झाडावर बसलेल्या 'किंग कोब्रा' ११.५ फुटांचा असल्याने त्याला पकडण्यासाठी तज्ज्ञ सर्पमित्रांची गरज होती. म्हणून वन विभागाने गोव्यातील 'रेस्क्यू स्कॉड' पथकातील सर्पमित्रांना पाचारण केले. पथकाचे प्रमुख अमृत सिंग यांनी काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. त्यानंतर सापाची तपासणी करुन अधिकाऱ्यांदेखत त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsnakeसाप