शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: फासकी लावून बिबट्याची हत्या; साळिस्ते येथील एकाला अटक, वनविभागाची कारवाई

By सुधीर राणे | Updated: January 8, 2024 17:19 IST

आरोपीने दिली गुन्ह्याची कबूली

कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकून मृत झाला आहे. या संरक्षित वन्यप्राणी असलेल्या बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फासकी लावणाऱ्या साळिस्ते येथील अनिल आत्माराम कणेरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ८ जानेवारी रोजी पहाटे हा गुन्हा घडला होता.साळिस्ते येथे फासकीमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती तळेरे येथील सामाजिक वनीकरणच्या वनपालांनी फोंडा येथील वनपालाना  दुरध्वनीवरुन दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पथक तत्काळ घटनास्थळी साळिस्ते  येथे दाखल झाले.  तिथे फासकीत अडकलेल्या  बिबट्याची त्यांनी माहिती घेतली. तसेच बिबट्याचे शव ताब्यात घेतले.साळिस्ते येथील विलास वरे यांच्या मालकीच्या आंबा बागेच्या संरक्षणाचे काम अनिल आत्माराम कणेरे (५५, रा. साळिस्ते)हे करतात. त्यांनी आंबा बागेच्या कुंपणास फासकी लावली होती. त्या फासकीत पहाटेच्या वेळी अंदाजे १० वर्ष वयाचा बिबट्या अडकला.तसेच तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.  याबाबतची माहिती वनविभागास दिल्यावर सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली  मृत बिबट्यास ताब्यात घेवून खारेपाटण येथील पशुधन विकास अधिकारी रविंद्र दळवी व जानवली पशुधन विकास अधिकारी  स्वप्नील अंबी यांच्याकडून शवविच्छेदन करुन त्याचे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दहन करण्यात आले.त्याचप्रमाणे अनिल आत्माराम कणेरे यांनी आंबा बागेत असणा-या कुंपणाला वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत  बिबट्या अडकून मृत पावल्याने त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कणेरे यांनी गुन्हा कबुल केला आहे. अशी माहिती कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, फोंडा वनपरिमंडळ अधिकारी धुळू कोळेकर, देवगड वनपाल  सारीक फकीर, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिट व वनरक्षक  अतुल पाटील, रामदास घुगे, सुखदेव गळवे, सिध्दार्थ शिंदे, प्रतिराज शिंदे, अतुल खोत व वनसेवक दिपक बागवे, चंद्रकांत लाड व साळिस्ते पोलिस पाटील  गोपाळ चव्हाण व ग्रामस्थ मोहन भोगले तसेच इतर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही  कारवाई करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग