शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

खेर्डी ग्रामपंचायतीत विक्रमी ८२ टक्के मतदान

By admin | Updated: April 23, 2015 00:04 IST

चिपळुणात ७०५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

चिपळूण : तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये १५३ प्रभागात ३३३ जागांसाठी ७०५ उमेदवार रिंगणात होते. आज (बुधवारी) या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करण्यात आले आहे. उद्या गुरुवारी सकाळी ८.३० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली. खेर्डी येथे ८२ टक्के, तर सावर्डे येथे ७३.७१ टक्के मतदान झाले. संपूर्ण तालुक्यात ८० टक्के मतदान झाल्याचे समजते. आज दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रात खेर्डी, सावर्डे, रामपूर, कोंडमळा अशा काही गावात तणावपूर्ण वातावरण होते. परंतु, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. कापसाळ येथे मतदान केंद्रावर पाऊण तास मतदान यंत्र बंद पडले होते. परंतु, प्रशासनाने तत्काळ हालचाल करुन हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे मतदारांची काही काळ गैरसोय झाली. याखेरीज कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त नाही. ५५ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे तोतयेगिरी करणाऱ्या व मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांवर वचक राहिला. खेर्डी व सावर्डे या दोन ग्रामपंचायतींत प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. या दोन्ही ग्रामपंचायतींत दुपारपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात लढत झाली. खेर्डीत राष्ट्रवादी पुरस्कृत सुकाई पॅनल विरुद्ध शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनल अशी लढत होती. सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेखर निकम यांचे पॅनल, तर शिवसेना व इतर पक्ष मिळून परिवर्तन पॅनल रिंगणात होते. खेर्डी येथे जयंद्रथ खताते विरुद्ध अनिल दाभोळकर हे दोघे पॅनलप्रमुख मैदानात होते. दाभोळकर यांना आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सहकार्य केले. दाभोळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाच्या नावाने मते मागितली. आज सकाळपासूनच खेर्डीत उत्साही मतदान सुुरु झाले होते. मतदानाचा कौल आजमावता दोन्ही पॅनलनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. सावर्डे येथे शेखर निकम, विजय गुजर, शांताराम बागवे, सूर्यकांत चव्हाण यांचे राष्ट्रवादी पॅनल, तर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळा पंडित, सुशील सावंत, सुनील जाधव यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात लढत होत आहे. सावर्डेत चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. येथे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी असल्याचा फायदा परिवर्तन पॅनलला होईल, अशी चर्चा होती. रामपूर, कापसाळ, कोंडमळा, पेढांबे, कळंबस्ते, दहिवली बुदु्रक, दहिवली खुर्द, चिवेली, मार्गताम्हाणे येथेही शांततेत मतदान झाले. खेर्डी येथे व्ही. बी. पोवार, तर सावर्डे येथे रामदास सावंत यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)तुरंबव येथे माजी पालकमंत्री आमदार भास्कर जाधव यांचे बंधू, विद्यमान सदस्य सुनील जाधव व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांचे बंधू विद्यमान उपसरपंच रामकृष्ण जाधव यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. ही लढत एकाच घरातील दोन पॅनलमधील असल्याने येथे चुरस वाढली आहे. आमदार जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत येथे मतदानाचा हक्क बजावला. उद्या सकाळी ८ वाजता प्रथम पोस्टल मतमोजणी सुरु होईल. त्यानंतर १० वाजता खेर्डी व सावर्डे ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. फेरी क्रमांक १ मध्ये येगाव, पेढांबे, कापसाळ, कोळकेवाडी, आगवे, कुटरे, खेरशेत, निवळी, चिंचघरी, कळंबस्ते, दविहली खुर्द, दहिवली बुद्रुक, कोंडमळा, फेरी क्रमांक २ मध्ये नांदिवसे, आकले, रिक्टोली, कादवड, तिवरे, पिंपळी बुद्रुक, कात्रोळी, भोम, रामपूर, मालघर, तोंडली, अलोरे, खडपोली, फेरी क्रमांक ३ मध्ये कुंभार्ली, तळसर, चिवेली, कोंढे, अडरे, नायशी, पालवण, मोरवणे, दळवटणे, तिवडी, रिक्टोली, कौंढरताम्हाणे, फेरी क्रमांक ४ मध्ये मार्गताम्हाणे खुर्द, पाचाड, शिरळ, तुरंबव, कोंडफणसवणे, वेहेळे, कुडप, कळंबट, फुरुस, ओवळी, पिंपळी बुद्रुक, कळमुंडी, वैजी, ताम्हाणमळा अशा चार फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. यासाठी १५ टेबल लावण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असेही तहसिलदार पाटील यांनी सांगितले.खेर्डी येथे सुकाई पॅनलचे प्रभाग क्र. १ मधील उमेदवार नीलेश भुरण यांनी श्री सुकाई मंदिरासमोर तर प्रभाग क्र. ४ चे उमेदवार दशरथ दाभोळकर यांनी बाजारपेठ येथे निकालापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी केली. तर प्रभाग क्र. ३ मध्ये सतीश शिंदे व प्रभाग क्र.४ मध्ये धनंजय दाभोळकर यांनी फटाके फोडले. प्रभाग क्र. १ मध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांनी सायंकाळी मोटारसायकल व चारचाकी गाड्यांची एक रॅली खेर्डी कातळवाडी बौद्धवाडी ते देऊळवाडी दरम्यान काढण्यात आली.