शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:52 IST

गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला.

ठळक मुद्देयुवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा जलदगतीने सामावून घेणार असल्याचे आश्वासन

सावंतवाडी : गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला.

गोवा राज्यात नोकरीस असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीत पुन्हा संधी मिळाली पाहिजे म्हणून माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी गोवा राज्यात निवासी सोय असणाऱ्यांना तातडीने संधी दिली जाईल तर निवासी सोय नसणाऱ्याबाबतीत १ जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.ई-पास तपासणी करून नोकरीत संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. तसेच ज्यांची राहण्याची सोय नाही, येऊन जाऊन नोकरीधंदा सांभाळत होते त्यांच्याबाबत येत्या १ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी केसरकर यांनी रविवारी चर्चा केली.गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोवा राज्यात राहण्याची सोय आहे, अशा तरुण-तरुणींना पासेस दिले जातील आणि नोकरीत सामावून घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच राहण्याची सोय नाही आणि ये-जा करून सहभाग घेणार आहेत. त्यांच्या बाबतीत १ जून रोजी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपणास आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिलीराज्यात राहण्याची सोय असणाऱ्या आणि पूर्वी नोकरी करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींनी पासेस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. मुंबईमधून काही रूग्ण औषधे आणत होते. त्यांना गोवा राज्यातून औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठेवला होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली, असे केसरकर म्हणाले. गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उत्तर गोवा अधिकारी यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चर्चा करून प्रस्ताव सादर करावा, असे ठरले.

आपण जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवा राज्यात औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एका औषध दुकानावर देण्यात येणार आहे, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपणास सांगितले होते.- दीपक केसरकर, आमदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाDeepak Kesarkarदीपक केसरकर Pramod Sawantप्रमोद सावंत