शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

केसरकरांनी आधी स्वत:ची पत तपासावी- संजू परब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 3:33 PM

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी.

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी. स्वत:च्या मतदारसंघात स्थानिक निवडणुकांत जिंकून येत नाही आणि मातोश्रीच्या शाबासकीसाठी राणेंवर टीका करतात, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी लगावला. सावंतवाडी तालुक्यातील खुनांचा तपास पहिला लावा आणि नंतर जिल्ह्यातील खुनांचे तपास लावा, असा सल्लाही परब यांनी यावेळी दिला.स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर तालुकाध्यक्ष संजू परब बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, सभापती रवी मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती निकिता सावंत, सत्यवान बांदेकर, लहू वारंग, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.परब म्हणाले, मंत्री केसरकर यांनी शासकीय रुग्णालयात एक महिन्यात वैद्यकीय अधिकारी भरू असे सांगितले आहे. जर खरोखरच त्यांनी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक केली तर आम्ही त्यांचे स्वागतच करून त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊ, असे सांगितले. अन्यथा आतापर्यंत जनतेची फसवणूक केली तशी यापुढेही करू नये. मंत्री केसरकर यांना जिल्ह्याच्या विकासापेक्षा राणेंवर टीका महत्त्वाची वाटत आहे. ते टीका करून स्वत:कडे लक्ष वेधून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अंकुश राणे, रमेश गोवेकर यांचा तपास लावणार असे केसरकर सांगत आहेत. मग त्यांना तीन वर्षे कोणी थांबवले होते, असा सवाल करीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेक खून झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील तिहेरी हत्याकांड, कारिवडेतील सुहानी माळकर, सावंतवाडीतील आनंद गुजराती प्रकरण अशी प्रकरणे तपासाविना आहेत. त्यांच्या कुटुंबांना तरी न्याय द्या. केसरकर हे स्वत:च्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही ते इतरांना न्याय काय देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.नगरपालिका निवडणुकीत काठावर पासनगरपालिका निवडणुकीत केसरकर काठावर पास झाले. तर पंचायत समितीत पूर्णपणे धुळ चारली. जिल्हा परिषदेमध्येही हातावर मोजण्या एवढ्याही जागा येऊ शकल्या नाहीत. याचा अर्थ राजकारणात कोणाची पत कोठे आहे ते सर्वांना कळते. ज्यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता येत नाही तेच राणेंची किंमत काढत आहेत. राणेंवर टीका केली, तर ह्यमातोश्रीह्ण आपणास शाबासकी देते, म्हणूनच ही टीका सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर