शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: October 30, 2015 22:38 IST

भालेकरांचा सल्ला : बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा कामावर लक्ष द्यावे

खारेपाटण : ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा पालकमंत्री केसरकरांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे’ असा सल्ला राष्ट्रीय कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भालेकर यांनी दिला आहे. आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पालकमंत्र्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भालेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी अशी बेताल वक्तव्य करण्याऐवजी आपले काम शिकून घेण्याचा प्रयत्न करावा, असा टोला भालेकर यांनी लगावला आहे. राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कामे सिंधुदुर्गात झाली. देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प पर्यटनवृद्धीच्या हेतूने आपल्या जिल्ह्यात खेचून आणला, चिपी विमानतळाचे काम सुरू केले, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लावले. मात्र, आताचे पालकमंत्री सुडबुद्धीने वागत असून सी-वर्ल्ड प्रकल्प बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. राणे असताना या पदाला एक शोभा होती. एक वलय प्राप्त झाले होते. त्यांचा प्रशासनावर वचक होता. धाक होता. मात्र, या पालकमंत्र्यांना ‘मी पालकमंत्री बोलतोय’ अशी स्वत:ची ओळख अधिकारी व कर्मचारी यांना करून द्यावी लागते. याचा विचार अगोदर करावा. ज्या पक्षाच्या जिवावर त्यांना लाल दिवा मिळाला आहे, त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जे वेळ देऊ शक त नाहीत. ते सिंधुदुर्गच्या जनतेला काय वेळ देणार. खुद्द शिवसेनेतील जुने-जाणते शिवसैनिक केसरकरांच्या कुटनीतीला वैतागले असून, अनेक शिवसैनिक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून बंडाच्या पवित्र्यात आहेत. मंत्रिपदी बसून वर्षाचा काळ लोटत आल; परंतु केसरकरांना आपले दालन सोडावेसे वाटत नाही. ज्या गोरगरीब जनतेच्या मतांवर मंत्री बनले, त्यांना रस्ते, पाणी, आदी समस्या भेडसावत आहेत. हे केसरकरांना जिल्ह्यात आल्याशिवाय कसे जमणार. राणे कुटुंबावर नाहक टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम केसरकर जोरदार राबवत आहेत. मात्र, अशा कोणत्याही प्रकारची टीका राणेंचा सच्चा कार्यकर्ता सहन करणार नाही. सत्तेत राहूनदेखील वेळप्रसंगी राणे साहेबांनी आंदोलने केली, ती फक्त जनतेच्या हितासाठीच, असे पालकमंत्री केसरकर करू शकतील काय? राणेसाहेबांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय स्वत: घेणाऱ्या पालकमंत्री केसरकरांचा डाव सिंधुदुर्गातील स्वाभिमानी जनतेने ओळखला आहे. जनताच त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल. हे केसरकरांनी लक्षात ठेवावे, असे सडेतोड उत्तर भालेकर यांनी केसरकरांना दिले. (वार्ताहर)