शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

केसरकर घोषणामंत्री, शिवसेना उद्धव ठाकरे गट सावंतवाडीत करणार 'एप्रिल फुल आंदोलन' 

By अनंत खं.जाधव | Updated: March 24, 2023 16:29 IST

अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी बॅनर लावून केसरकरांचा निषेध करणार

सावंतवाडी : दीपक केसरकर हे फक्त घोषणा मंत्री आहेत. गेल्या तेरा वर्षात आमदार व मंत्री पदाच्या काळात त्यांनी घोषणा करण्याच्या पलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या घोषणा आणि अर्धवट कामांचा निषेध करण्यासाठी १ एप्रिलला प्रत्येक अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी “एप्रिल फुल” आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला.

ते शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बंड्या घोगळे, निशिकांत पडते, आबा सावंत, राजू शेटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.डिसोझा म्हणाले, राजन तेलींनी आमदार हटाव आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.भविष्यात ठाकरे गटाच्या माध्यमातून  सुद्धा आमदार हटाव आंदोलन करण्यात येणार आहे. केसरकर यांनी गेल्या अनेक वर्षात अनेक घोषणा केल्या आहेत. सद्यस्थितीत तेरा वर्ष त्यांच्या आमदारकीला झाली आहेत. परंतु आश्वासना आणि घोषणांच्यापलीकडे त्यांनी मतदारसंघात काही केले नाही. त्यामुळे त्यांना आता घोषणामंत्री म्हणून आम्ही उपाधी देण्याचा निर्णय घेतला आहे. केसरकारांनी ज्या ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि ते प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी “एप्रिल फुल” आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी बॅनर लावून केसरकरांचा निषेध करण्यात येणार असल्याचे डिसोजा यांनी सांगितले.रोजगार उभारण्यात येणार असे सांगून चष्म्याचा कारखाना आणतो, काथ्या उद्योग अशा अनेक वल्गना केल्या. आंबोलीचा विकास केल्याचे सांगितले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणणार असल्याचे सांगितले. परंतु अद्याप एकही वीट त्या ठिकाणी लागलेली नाही. केवळ घोषणा करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. ही वस्तुस्थिती आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर