शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:12 IST

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या असल्याची माहिती कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग होणारसंदेश पारकर यांची माहिती : पालकमंत्र्यांनी दर्शविली संमती

कणकवली : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय हे कोविडसाठी राखीव करण्यात आलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसहीत अत्यावश्यक उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयावर आलेली आहे. अशा स्थितीत या रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या असल्याची माहिती कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांची संदेश पारकर यांनी भेट घेतली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, पालकमंत्र्यांशी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठा शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे व इतर समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेंसहीत उर्वरित समस्याही तातडीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले आहे.पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. डॉ. धनंजय चाकुरकर यांनी पूर्णवेळ भूलतज्ज्ञ देण्याचे मान्य केले आहे, तसेच येथे एकच स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने आठवड्यातून दोन वेळा दुसरा स्त्रीरोगतज्ज्ञ देण्यात येईल.

येथील ट्रामा केअर सेंटरमधील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रासम यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले होते. मात्र, सद्यस्थितीत तेथे उपचार होत नसल्याने त्यांना कणकवली येथे पाठविण्यात यावे. तसेच येथे प्रशस्त असा शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे पारकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पूर्णवेळ फिजिशियन देण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत.योजना कार्यान्वित करणारउपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजना मंजूर आहे. दीड महिना झाला तरीही इंटरनेट, संगणक व इतर किरकोळ कामांसाठी सुमारे एक लाख रुपयांची गरज आहे. या कामांसाठी योजना सुरू करता आलेली नसल्याचे आमच्या चर्चेदरम्यान स्पष्ट झाले.

याबाबतही तातडीने कार्यवाही करून गोरगरिबांसाठीची ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रयत्न आपण करणार असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. तसेच मास्क, पीपीई किट, सॅनिटायझरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पारकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग