शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायत निवडणूक खर्चात उधळपट्टी : नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:44 IST

अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी मोठ्याप्रमाणात उधळपट्टी झाली असून नगरपंचायत फंडातून हा खर्च करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी संगनमताने ही उधळपट्टी केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत निवडणूक खर्चात उधळपट्टी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार 

कणकवली : अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी मोठ्याप्रमाणात उधळपट्टी झाली असून नगरपंचायत फंडातून हा खर्च करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी संगनमताने ही उधळपट्टी केल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला आहे.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड, नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, आरोग्य सभापती अ‍ॅड. विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणे, बंड्या गांगण आदी उपस्थित होते.यावेळी  समीर नलावडे पुढे म्हणाले, 2013 साली कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी झालेल्या खर्चाच्या चौपट खर्च सन 2018 च्या निवडणुकीत करण्यात आला आहे. तसेच मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा खर्च जनतेच्या खिशातील पैशातून म्हणजेच नगरपंचायत फंडातून करण्यात आला आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सन 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीचा खर्च 7 लाख 43 हजार 652 रूपये इतका होता.तर हाच खर्च 2018 साली 28 लाख 33 हजार 324 रुपये इतका झालेला आहे. केवळ मंडप आणि खुर्ची , टेबल अशा साहित्यावरच 7 लाख 84 हजार 846 रुपयांचा खर्च झाला आहे. व्हिडीओ शूटिंगसाठी 4 लाख 34 हजार 150 रूपये , स्टेशनरीसाठी 3 लाख 27 हजार 363 रूपये, चहापान तसेच अल्पोपहारसाठी 3 लाख 64 हजार 180 रूपये खर्च करण्यात आला आहे.नगरपंचायत फंडातून हा निवडणूक खर्च करण्यात आला असून कणकवलीकरांनी दिलेल्या करातून जमा झालेल्या पैशावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक प्रकारे डल्ला मारला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी अवधूत तावडे व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही याबाबत अधिकृत तक्रार करणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, 2013 साली झालेल्या निवडणुकीच्यावेळी आम्ही सत्तेत होतो. त्यामुळे त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकाऱ्याना सांगून कणकवली नगरपंचायत कार्यालय व बहुउद्देशीय सभागृहाचा वापरच निवडणुकीसाठी केला होता. त्यामुळे त्यावेळी खर्च ही कमी झाला होता. मात्र 2018 च्या या निवडणुकीत कोणालाही विचारात न घेता तहसीलदार कार्यालयाचा वापर केल्याने त्याठिकाणी काही सुविधा निर्माण कराव्या लागल्या .

परिणामी खर्चात वाढ झाली आहे. नगरपंचायतीकडे सक्षम जागा असताना ती वापरण्यात आली नाही. असे का करण्यात आले ? तसेच नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याच्या पूर्वीच या झालेल्या खर्चाची देयके संबधित व्यक्तिना अदा करण्यात आली होती. ही उधळपट्टी करताना त्यामध्ये कोणी एजंट होते का ? याचीही चौकशी जिल्हाधिकाऱ्यानी करावी अशी मागणी करणार असल्याचे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.अन्य प्रकरणेही लवकरच बाहेर काढणार !कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी खर्च करताना प्रशासनाकडून खूप उधळपट्टी करण्यात आली आहे. अशी अन्य काही प्रकरणे असून तीही लवकरच बाहेर काढणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका