शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:58 IST

कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढलीअत्यावश्यक सेवेतील नागरिक पडले बाहेर

कणकवली : कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक संघटना व नागरिकांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यामुळे कणकवली शहरातील नेहमीच गजबलेली बाजारपेठ ठप्प झाली आहे. कणकवली शहरात सरासरी २० ते २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. परंतु सध्या ही कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या दोन दिवसांपासून कमी होताना दिसत आहे.

तालुक्यातील आकडेवारीतही काहीशी घट झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी या जनता कर्फ्यू मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. तसेच सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या नेत्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हा बंद यशस्वी झाला आहे.नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्व स्तरातील नागरीकांनी पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे २० सप्टेंबर पासून आतापर्यंत कणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे.अत्यावश्यक सेवेसाठी मेडिकले, दवाखाने सुरूकलमठ, जानवली, हळवल, वागदे, तळेरे, खारेपाटणसह कणकवलीमध्ये जनता कर्फ्यू आहे. या ठिकाणी बाजारपेठ बंद आहे. दूध व पेपर विक्री सकाळी ९ वाजेपर्यंत केली जाते. तर अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी मेडिकल व खासगी दवाखाने चालू ठेवण्यात आले आहेत. काही अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एसटी सेवा, बँका, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालये चालू आहेत. मात्र त्या ठिकाणी शुकशुकाट आहे. सोमवारपासून हे वातावरण पुन्हा सुरळीत होईल. त्याची वाट नागरिकांकडून पाहिली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग