शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांची विरोधकांबरोबर खडाजंगी!, ठेकेदार शिवसेना शहरप्रमुखाच्या अंगावर धावून गेला

By सुधीर राणे | Updated: January 23, 2023 13:58 IST

दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यातही शाब्दिक बाचाबाची

कणकवली : कणकवली शहरामध्ये रेल्वे स्थानक रस्त्यावर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम पूर्ण झाले होते. त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो रस्ता सोमवारी सकाळी मोठी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने खचला. या विषयावरून कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी शिवसेना कणकवली शहरप्रमुख उमेश वाळके यांनी काम थांबवा,हे काय करता?  असे विचारले असता ठेकेदार जावेद शेख त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठी बाचाबाची झाली. त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक सुशांत नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. या दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना देखील जाब विचारणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतने रेल्वे स्थानक परिसरात गटारासाठी खोदलेला रस्ता काम झाल्यानंतर भराव टाकून पूर्ववत करण्यात आला होता. पण सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो रस्त्या खचून कणकवली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यावर रस्ता पुन्हा खचला. मात्र मोठा अनर्थ टळला.यावेळी तत्परतेने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम तिथे पोहोचली. तसेच तेथील काम चालू केले. त्याचवेळी  विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके, तेजस राणे, नगरसेवक कन्हैया पारकर हे देखील उपस्थित झाले. 

यावेळी संबधित काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. यावेळी  नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक यांनी कडाडून विरोध करत निवडणुकीच्या तोंडावर विरोधक राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला. तर कामास तत्परतेने सुरुवात करत लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून कणकवली शहराचा पाणीपुरवठा  सुरळीत करणार असल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले. या दरम्यान ठेकेदार जावेद शेख हे उमेश वाळके यांच्या अंगावर धावून गेले असता त्यांना थांबवण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व सुशांत नाईक यांनी मध्यस्थी  केली व प्रकरण मिटवले. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची  झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, बाबू गायकवाड, कन्हैया पारकर, तेजस राणे तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना