शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कणकवलीत व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, राहत्या घरी डोक्यावर पिस्तूल रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:12 IST

चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने कणकवली शहरातील होलसेल व्यापाऱ्यावर रिव्हॉल्व्हरच्या सहाय्यानं हल्ला करण्याची घटना घडली आहे.

कणकवली : चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने कणकवली शहरातील होलसेल व्यापाऱ्यावर रिव्हॉल्व्हरच्या सहाय्यानं हल्ला करण्याची घटना घडली आहे.  हल्ल्यात व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोवेकर (65) हे जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.कणकवली बाजार पेठेत होलसेल व्यापारी विद्यामंदिर हायस्कूलजवळ राहतात. सोमवारी रात्री ते दुकान बंद करून रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घरी गेले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजविला. त्यामुळे त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हर त्यांच्यावर रोखले. आपल्या घरी कोण आले आहे हे पाहण्यासाठी ते व्यापारी बाहेर आले असता त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील स्प्रे त्यांच्यावर फवारला.तसेच काही समजायच्या आतच त्यांच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर मारली आणि तो पळून गेला. जखमी झालेल्या त्या व्यापाऱ्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. तोपर्यंत ती अज्ञात व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती. जखमी असलेल्या त्या व्यापाऱ्याला तेथिलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.