शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली, भाविकांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:56 IST

'दिगंबरा, दिगंबरा,भालचंद्र बाबा दिगंबरा' च्या जयघोषाने रविवारी सायंकाळी कणकवली नगरी दुमदुमून गेली.

कणकवली : 'दिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबरा' च्या जयघोषाने रविवारी सायंकाळी कणकवली नगरी दुमदुमून गेली. निमित्त होते ते येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या 114 व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.3 जानेवारीपासून येथील आश्रमात परमहंस भालचंद्र महाराजांच्या जयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता. रविवारपर्यंतच्या कालावधीत या ठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड आरती, समाधी पूजन, भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान, आरती, भजने, कीर्तन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.रविवारीही जयंती दिनानिमित्त पहाटे 5 वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव दुपारी 12 वाजता साजरा करण्यात आला. सुहासिनीनी परमहंस भालचंद्र महाराजांची बाल मूर्तीला पाळण्यात घालून झोके दिले. हा सोहळा पाहताना अनेक भाविकांनी आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर कणकवली शहरातून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोडे, उंट तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी केलेल्या भालचंद्र नामाच्या जयघोषाने कणकवली नगरी दुमदुमुन गेली होती.शहरातील तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मित्र मंडळ , रिक्षा संघटना , छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ तसेच इतर अनेक मंडळानी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार तसेच चहा-पाण्याची सोय केली होती. तसेच नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुबक अशी रांगोळी काढली होती. विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. अनेक मंडळानी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौका-चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच भक्तिमय बनले होते.ही पालखी मिरवणूक रात्री पुन्हा आश्रमात आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर कुडाळ नेरूर येथील सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा द्शावतारी नाट्य प्रयोग झाल्यावर या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. दरम्यान, या जयंती महोत्सवासाठी गोवा, मुंबई, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक कणकवलीत दाखल झाले होते.त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.