शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सिंधुदुर्ग : स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत प्रभात फेरी, उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 16:11 IST

'स्वच्छ कणकवली , सुंदर कणकवली ' असा संदेश देत कणकवली नगरपंचायत,रोटरी क्लब सेंट्रल व डॉक्टर फ्रायडे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मंगळवारी काढण्यात आली. या प्रभात फेरिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देकणकवलीत स्वच्छतेचा संदेश देत प्रभात फेरीकणकवली नगरपंचायत,रोटरी क्लब, डॉक्टर फ्रायडे क्लब यांच्यावतीने आयोजन

कणकवली : 'स्वच्छ कणकवली , सुंदर कणकवली ' असा संदेश देत कणकवली नगरपंचायत,रोटरी क्लब सेंट्रल व डॉक्टर फ्रायडे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मंगळवारी काढण्यात आली. या प्रभात फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रभातफेरीचा शुभारंभ पटकीदेवी मंदीर येथून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजारपेठ मार्गे निघालेल्या या फेरीची सांगता उपजिल्हा रुग्णालय समोर झाली.यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे,कन्हैया पारकर,सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,महेश सांब्रेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे,प्रतीक्षा सावंत,रोटरी क्लब प्रेसिडेंट महेंद्र मुरकर, दिपल बेलवलकर, दादा कुडतरकर, अ‍ॅड.दिपक अंधारी, नितीन म्हापणकर,ब्रँड अ‍ॅम्बेसिडर डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ.संदीप नाटेकर,डॉ. स्वप्नील राणे,डॉ.सुहास पावसकर,डॉ.संगीता मोघे ,मीनल आपटे, वृषाली पाकळे, मेस्त्री,शेखर राणे,उदय आळवे तसेच आयडीयल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी,नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कणकवलीतून मंगळवारी काढलेल्या कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक, तसेच रोटरी क्लब, डॉक्टर फ्रायडे क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.(अनिकेत उचले )कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.तसेच सुका,ओला,कचरा वर्गीकरण,प्लस्टिक बंदी या विषयी जनजागृती केली जात आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये रोटरी क्लब व डॉक्टर फ्रायडे क्लब यांनी सहभागी होत स्वच्छता सर्वेक्षणा विषयीचे पत्रक वाटप करत स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

तसेच डिजीटल तंत्र स्क्रिनद्वारे स्वच्छताविषयीची डॉक्युमेंटरीव्दारे जनजागृती केली.पटकीदेवी मंदिर मार्गे ढालकाठी- बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक हायवे मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे जात या फेरीचा समारोप करण्यात आला.स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे !कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम शासनाचा एक भाग म्हणून न रहाता यामध्ये सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी बहुसंख्येने त्यामध्ये सहभागी व्हावे. या प्रभात फेरीत रोटरी क्लब, डॉक्टर फ्रायडे क्लब तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहर स्वच्छतेसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे मी विशेष कौतुक करतो, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग