शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

कुडाळेश्वर मंदिरावर आज कलशारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 23:57 IST

विविध कार्यक्रम : स्वामी सद्गुरू सरस्वती स्वामींची उपस्थिती

कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर मंदिरच्या सुवर्ण कलशाचे कलशारोहण शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ वाजता कर्नाटक येथील बसवकल्याण मठाधिपती श्री श्री श्री दामोदरपंत स्वामी सद्गुरू सदानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कुडाळचे अध्यक्ष प्रसाद धडाम यांनी पत्रकार परिषदेत केले. कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या मुंगसाळी मंडपाचे नुतनीकरणाचे काम सुरू असून, या मंडपावर सुवर्ण कलशाचे कलशारोहण १५ मे रोजी होणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, कुडाळचे सदस्य सुनील भोगटे म्हणाले, मंदिराच्या मुंगसाळी मंडपाला वापरलेली लाकडे १२५ वर्षांपूर्वीची असल्याने ती जीर्ण झाली होती.त्यामुळे येथील ग्रामसभेत व देवस्थान सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे या मुंगसाळी मंडपाच्या नुतनीकरणाचे काम झाले असून, या मंडपाला वापरण्यात आलेले सर्व लाकूड सागवानी आहे. याचा खर्च सहा लाख रुपये काढण्यात आला होता. मात्र, हा खर्च १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सुवर्णकलश पसंती या मुंगसाळीचे काम करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते सुवर्णकलशच बसविण्याचे ठरविण्यात आले. सर्व भाविक -भक्तांनी या सुवर्णकलशासाठी सुमारे १६० ग्रॅम सोने दिले. तसेच इतर कामांसाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत भाविकांनी केली. दगडी मंदिर नको- देवतेची आज्ञा कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वराचे मंदिर भव्यदिव्य बांधण्याची आम्हा सर्वांची इच्छा होती व तसा कौलही लावण्यात आला होता. मात्र, देवाने तसा प्रसाद दिला नाही. त्यामुळे ज्या पद्धतीचे सध्याचे मंदिर आहे, तसेच मंदिर असावे, अशी देवाची इच्छा असावी. देवाच्या आज्ञेप्रमाणेच मुंगसाळी मंडपाचे काम पूर्वापार पद्धतीनेच करण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)लाकडावर कोरीव काम स्थानिकांकडूनमंडपासाठी वापरण्यात आलेल्या सागवानी लाकडावरील कोरीव काम नेरूर येथील विलास मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून ते येथील स्थानिक कलाकार आहेत, हे विशेष. कलशारोहण सोहळ्यानिमित्त १५ मे रोजी पहाटेपासून धार्मिक कार्र्यक्रम, १० वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमराज शिवराम सावंत-भोसले राजेसाहेब यांचे शाही स्वागत व औक्षण, ११ वाजता सुवर्ण कलशाची श्री देव कुडाळेश्वर मंदिरास प्रदक्षिणा व ११.१५ वाजता श्री श्री श्री दामोदरानंद स्वामी यांच्याहस्ते कलशारोहण असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे हिरोजी उर्फ दादोजी परब उपस्थित राहणार आहेत. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ६ वाजता आजगावर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.