शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत १३ मे पासून कलशारोहण सोहळा

By admin | Updated: May 11, 2015 00:55 IST

नाशिक गोवर्धन येथील दत्तदास महाराज प्रमुख उपस्थित

कणकवली : शहरातील बांदकरवाडी येथील श्री दत्तमंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा १३ ते १६ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. नाशिक गोवर्धन येथील दत्तदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कलशारोहण सोहळा होणार आहे. कणकणवली शहरातील बांदकरवाडी येथे हे दत्तमंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून मंदिराचा कलशारोहण समारंभ १३ ते १६ मे यादरम्यान विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने १३ मे पासून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७ वाजता श्री स्वयंभू मंदिर ते दत्त मंदिरापर्यंत कलश दिंडी, सकाळी ९ वाजता पुण्याहवाचन, मातृकापूजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यानंतर सुश्राव्य भजने, रात्री ८ वाजता लांजा धुंदरे येथील श्री वांजूदेवी नाट्य नमन मंडळाचा ‘नमनाचा कार्यक्रम’ होणार आहे. १४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम तसेच कलशारोहण, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता सुश्राव्य भजने, सायंकाळी ४ वाजता ह. भ. प. गवंडळकर महाराज यांचा हरिपाठ, रात्री ८ वाजता हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, १५ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री ८ वाजल्यापासून आवळेगाव येथील सचिन भाटवडेकर यांचे प्रवचन तर रात्री ९ वाजता आर्ट सर्कल देवगड प्रस्तुत तीन अंकी संगीत नाटक ‘संत गोरा कुंभार’, १६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आनंदवर्धिनी प्रस्तुत गुरुवंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, तर रात्री ९ वाजता खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचा ‘कली प्रताप’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. (वार्ताहर)