शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

काका कुडाळकरांचा राजीनामा

By admin | Updated: April 20, 2016 01:15 IST

भाजप प्रवक्तेपद : नगरपंचायत पराभवाची घेतली जबाबदारी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी आपला भाजप जिल्हा प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती कुडाळकर यांनी दिली. शतप्रतिशत भाजपच, पार्लमेंट टू नगरपंचायत अशाप्रकारचा नारा घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीच्या प्रचारातही मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती. मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी भाजपाचे नेते, पदाधिकारी आले होते. विशेष म्हणजे स्वबळावर भाजपा ही निवडणूक लढवित होती. तसेच या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व कुडाळातील पदाधिकारी काका कुडाळकर यांच्याकडे होती.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र भाजपाला १७ जागांपैकी केवळ एका जागेवर विजय संपादन करता आला. त्यामुळे भाजपाच्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये झालेल्या या दारूण पराभवाची जबाबदारी काका कुडाळकर यांनी स्वीकारत आपल्या जिल्हा प्रवक्तेपदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे दिला आहे. (प्रतिनिधी)राजीनामा मंजूर की नामंजूर?कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला, तरी तो राजीनामा आता जिल्हाध्यक्ष जठार मंजूर क रणार की नाही, याक डे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.