शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

चिपळुणात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पधा

By admin | Updated: November 5, 2014 00:06 IST

जिल्हास्तरावर आयोजन : निमंत्रित संघांनाच सहभागाची संर्धी

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ व ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे दि. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान जिल्हास्तरीय निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविली जाणार आहे. स्पर्धेमध्ये नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. शहरातील जुना कालभैरव मंदिर नजीकच्या सागर मंचसमोरील मैदानावर सुरेश शेट्ये क्रीडा नगरीत सायंकाळी ५ नंतर या स्पर्धा होणार आहेत. प्रकाशझोतात खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये न्यू हिंद विजय, नम्रता प्रतिष्ठान, गुरुकुल क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, दसपटी क्रीडा मंडळ, गजानन संघर्ष क्रीडा मंडळ, वाघजाई क्रीडा मंडळ, कळकवणे क्रीडा मंडळ हे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण ही संस्था १९८२ मध्ये मनोहर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश सोमण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या या संस्थेच्या अध्यक्षपदी भाऊ काटदरे आहेत. क्रीडा क्षेत्राबरोबरच संस्थेने सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामाजिक बांधिलकी जपताना नेत्रदान हा संकल्प सुरु केला. संस्थेने यावर्षी कालभैरव जयंतीचे औचित्य साधून कालभैरव चषक ही मॅटवरील कबड्डी स्पर्धा भरविण्याबाबत नियोजन केले आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे, अशी माहिती संघर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिली. यावेळी कालभैरव देवस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त समीर शेट्ये, नयन साडविलकर, कमलाकर बेंडके, मुन्ना कदम, भाऊ पवार, रवींद्र लवेकर, विकास पवार आदी उपस्थित होते. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने घेतली जाणार आहे. नामवंत खेळाडू स्वप्नील शिंदे, सतीश खांबे, शैलेश सावंत, भूषण कुलकर्णी, शेखर तटकरी, बाबू शिंदे, प्रांजल पवार व गोट्या कुंभार आदी खेळाडूही स्थानिक संघातून खेळणार आहेत. विजेत्या संघाला २१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला १५ हजार , कालभैरव चषक तसेच तृतीय संघाला १० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला ५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू, दमदार चढाई व उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडंूनाही गौरविण्यात येणार आहे. ५ हजार क्रीडापे्रमी सामावतील, अशी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. केबल नेटवर्कवरुन याचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने याचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. (वार्ताहर)रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणार स्पर्धा.सर्वोत्कृष्ट खेळाडू, दमदार चढाई व उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडंूनाही गौरविण्यात येणार.साखळी व बाद पद्धतीने घेतली जाणार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा.