शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

फणसाचा टेम्पो उलटून नांदगावातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:49 IST

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर ...

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर शनिवारी रात्री ११.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिडयेवाडी (कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिडये रात्री ८ च्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी पाली-निवळी बावनदी या रस्त्याने हा टेम्पो जात होता. रात्री ११.४५ च्या दरम्यान निवळी-शेल्टेवाडी येथे रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यामुळे उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक मारला असता टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला. यामध्ये टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये बसलेले देवेंद्र आत्माराम बिडये (४५) व जयवंत कृष्णा बिडये (४१) हे जागीच ठार झाले.या टेम्पोतून प्रवास करणारे विठ्ठल विजय बिडये, लक्ष्मण नारायण बिडये, अश्विनी लक्ष्मण बिडये, अनिकेत लक्ष्मण बिडये, राजेश बाळकृष्ण तांबे (सर्व नांदगाव, बिडयेवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे व आतील फणसांचे नुकसान झाले आहे.कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाजयवंत यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी, तर देवेंद्र यांच्या पश्चात पत्नी आई, वडील व दोन मुली आहेत. दोघांच्याही घरच्या कर्त्या पुरुषांवरच काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.या दोघांचेही मृतदेह रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. नांदगाव येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांना शनिवारी रात्री अपघाताची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी या दोघांचेही मृतदेह नांदगाव येथे आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारनंतर नांदगावची संपूर्ण बाजारपेठ, सहा आसनी, मॅजिक रिक्षा बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.रुग्णवाहिका चालकामुळे उपचारअपघातावेळी घटनास्थळी जोरदार पाऊस होता. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना अपघाताची माहिती मिळाली. ते एवढ्या रात्री, भरपावसात तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले. तेथून जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली.