शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

जयराज मालवणकर अद्याप मोकाटच

By admin | Updated: May 13, 2015 00:56 IST

पोलीस तपास निष्क्रिय : दोन वर्षे पोलीस यंत्रणेला देतोय गुंगारा

श्रीकांत चाळके - खेड -कोकण रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी तब्बल लाख रूपये मोजणाऱ्यांची आता दयनीय अवस्था झाली आहे. खेड तालुक्यातील १५ तरूण बेरोजगार आणि त्यांचे पालक जयराज मालवणकर या भामट्याला बळी पडले आहेत. दोन वर्षे उलटली तरीही पोलिसांना याकामी यश आले नाही. मालवणकर हा अद्याप मोकाट आहे. त्याला पोलीस का अटक करू शकत नाहीत, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे़ .मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासी असलेला जयराज मालवणकर भरणे - गौळवाडी येथे गेल्या पाच वर्षांपासून राहात होता. काही दिवस खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करता करता त्याची अनेकांशी ओळख झाली. त्याचा फायदा त्याने अनेकदा उठवला. अशातच २०११मध्ये आंबवली, विहाळी, किंजळे, चकदेव आणि दयाळ येथील १५ लोकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून रक्कम हडप केली आहे. कोकण रेल्वेसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी २५ हजार ते २ लाख रूपयांना मालवणकरने फसवले. याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, त्याला अद्याप यश आले नाही. विशेष म्हणजे मालवणकरची बँक खाती असलेल्या आयसीआयसीआय बँकेत २०१३ मध्ये केवळ २५६ रुपये शिल्लक होते. तरीही त्याने या तरूणांना धनादेश दिले होते. खात्यात पैसे शिल्लक नसल्याने या धनादेशांचा अनादर झाला आहे. मालवणकरने याअगोदरही अशा प्रकारे काहींना फसवल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर तो भरणे येथील त्याच्या भाड्याच्या खोलीतून फरारी झाला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास न केल्याने मालवणकर फाईल अद्याप जैसे थे असल्याचे बोलले जात आहे. फसवणूक झालेल्या बेरोजगार तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी पोलिसांना साकडे घालूनही याकामी पोलिसांना तपासात यश आले नाही. मालवणकर खेडमध्ये येऊनही त्याला पोलिसांनी हात लावला नाही, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणानंतर दोन पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत. नवे आलेले पोलीस निरीक्षक याबाबत बोलण्यास तयार नाहीत. यामुळे मालवणकर प्रकरणाची ही फाईल बंद केली की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. 1कोकण रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे मोजणाऱ्यांची अवस्था दयनीय. 2खेड तालुक्यातील भामट्याचा तपास लावण्यात यंत्रणेला दोन वर्षे अपयश. 3मूळचा सिंधुदूर्गचा रहिवासी मात्र गेली पाच वर्षे राहात होता भरणे येथे.4अनेकांना गंडा घालणाऱ्यावर खेड पोलिसांत दाखल झाला होता गुन्हा.