शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2024 16:55 IST

सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार 

सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला नौदल जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. कल्याण मधील जयदीप आपटे यांच्यापर्यंत नौदलाला कोणी नेऊन पोचवलं यांची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यापूर्वीच गुन्हे कसे दाखल झाले, यात काही तरी गौडबंगाल आहे असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौकशी समिती नेमायची असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन नाव ठरवा अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्याना सर्वसामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत.जबाबदारी झटकून चालणार नाही मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले, त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही अशी मागणी ही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समितीत नेमाया घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का,? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समिती नेमावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला हे जनतेने जाणून घ्यावे. हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.मंत्री केसरकरांच्या आश्वासनाचे काय झाले?मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात फक्त लोकांना आश्वासनेच दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रेल्वे टर्मिनसचे काय झाले ते त्यांनी सांगावे. आता जनताच त्यांना त्याची जागा दाखवून देईल. 

सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार सावंतवाडी मतदारसंघावर जरी उद्धव सेनेकडून दावा केला जात असला तरी आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीत सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार असून आमचे उमेदवार ठरले आहेत पण आताच घोषणा करणार नाही असे म्हणत अर्चना घारे-परब याच्याकडे अंगुली निर्देश केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकार