शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायतीकडून मारहाण, तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: April 24, 2017 23:28 IST

जातपंचायतीकडून मारहाण, तरुणाची आत्महत्या

दापोली : प्रेम केले म्हणून गावपुढाऱ्यांनी जातपंचायत बोलावून एका तरुणाला रात्रभर डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार दापोली तालुक्यात घडला आहे. सुजन चव्हाण असे या तरुणाचे नाव असून, या मारहाणीच्या घटनेमुळे त्याने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मारहाणीचा विषय नमूद केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेला चार दिवस झाले तरी अजूनही त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.मृत सुजन हा दापोली तालुक्यातील ओणीभाटी गावातील आहे. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्यापही कोणाला अटक केलेली नसून, सुजनच्या आई आणि वडिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या घटनेची दाभोळ पोलिसांत तक्रार देण्यात येऊनही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सुजनचे जवळच्याच भडवली गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. याच प्रेमाखातर सुजन भडवली गावामध्ये गेला होता. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊही होता. मात्र, तेथे गावच्या काही प्रमुख लोकांनी त्याचा जाब विचारत जातपंचायत बोलावली. भर बैठकीत सुजनला संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावपुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी सुजनला डांबून ठेवले असल्याची माहिती सुजनच्या चुलतभावाने दिली आहे. या सगळ्यामध्ये त्याचा हा चुलतभाऊ साक्षीदार आहे. या सगळ्याचा मनस्ताप होऊन सुजन दि. २१ एप्रिल रोजी आपल्या घरी आला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. (प्रतिनिधी)