शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अनारोजीन लोबोंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:35 IST

नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केली. तसेच गवळी तिठ्यावरच्या टपऱ्या काढण्यासाठी कोणी पत्र दिले? असे सांगत त्यांनी ते पत्र पत्रकारांना दाखविले.

ठळक मुद्देतुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अनारोजीन लोबोंचा इशारा संजू परब यांच्यावर कडाडून टीका

सावंतवाडी : नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केली.नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मंगळवारी येथील केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी दळवी, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते. 

लोबो यांनी मासिक बैठकीच्या अजेंड्यावरून परब यांच्यावर टीका केली. शासनाचा अध्यादेश आहे. बैठका आॅनलाईन पद्धतीने घ्या, असे असताना परब यांनी आॅफलाईन बैठक कशी काय घेतली. मुख्याधिकारी यांचीही चूक आहे. फक्त दिशाभूल करणारे कागद दाखवायचे एवढेच काम परब करीत आहेत. पण आता जनता हुशार आहे. जे नगरसेवक बैठकीला आले नाहीत त्यांना पक्ष व्हीप काढेल. त्यांनी त्यांची उत्तरे पक्षाकडे द्यावीत. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही लोबो यांनी यावेळी सांगितले.ते स्टॉल काढण्याचे पत्र कोणी दिले ?आमची पत्रे सगळ्यांना दाखवता पण आम्ही स्टॉल हटावाबाबत कुठलेही पत्र दिले नाही. उलट नवीन स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याची कारणे शोधावी लागतील. ते स्टॉल काढा अशीच आमची भूमिका आहे, असे लोबो यांनी सांगितले. मात्र, आमची पत्रे पुढे करता मग गवळी तिठ्यावरचे स्टॉल काढण्यासाठीचे पत्र कोणी दिले याची माहिती सर्व जनतेला आहे. जे आपले अधिकार नाही ते अधिकार वापरायला बघता का? असा सवालही यावेळी लोबो यांनी केला. गवळी तिठ्यावरच्या टपऱ्या काढण्यासाठी कोणी पत्र दिले? असे सांगत त्यांनी ते पत्र पत्रकारांना दाखविले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग