शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

ठाकरेंमुळेच सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय दिसले- विनायक राऊत

By अनंत खं.जाधव | Updated: February 2, 2024 20:05 IST

मंत्री केसरकरांना प्रत्युत्तर

सावंतवाडी: मंत्री दीपक केसरकर हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत काय केले असे विचारणे म्हणजे केलेले उपकार विसरण्यासारखे आहेत सिंधुदुर्गला  वैद्यकीय महाविद्यालय ठाकरेंमुळेच दिसले अन्यथा हे महाविद्यालय कधी झालेच नसते असे प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी मंत्री केसरकर यांना दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रविवारी सावंतवाडीत येत आहेत त्या दौऱ्यानिमित्त आढावा बैठक खासदार विनायक राऊत यांनी घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,सहसंर्पक प्रमुख शैलेश परब गितेश राऊत,रुची राऊत,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले,दीपक केसरकर हे आज कितीही मंत्री नारायण राणे यांचे गुणगान गात असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे.ते सगळ ओळखतात त्याना माहिती आहे.राणेंचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद आहे म्हणून ओरड मारणाऱ्या केसरकरांना एवढ्या लवकर साक्षात्कार कसा काय झाला हे आता जनतेने शोधावे असा टोला ही राऊत यांनी मारला.माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकर यांना ड्रायव्हर म्हटले होते.याची आठवण ही राऊत यांनी यावेळी करून दिली.

मंत्री केसरकर हे उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले म्हणून विचारतात पण त्याना हे माहीत नाही कि ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय येऊ शकले हे त्यांनी लक्षात ठेवावे या वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा तीव्र विरोध होता असे असतना ठाकरे यांनी हे महाविद्यालय होण्यासाठी केंद्रात जो पाठपुरावा केला त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.हे कदाचित केसरकर विसरले असतील पण येथील जनता विसरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.राजू शेट्टीनी हातकणंगले मधून लढावेराजू शेट्टी यांनी हातकणंगले मधून लढावे अशी भावना महाविकास आघाडीची आहे.तसेच तेथील शेतकरी व ऊसउत्पादक शेतकरी पण मागणी करत आहेत त्यामुळे आमचा ही आग्रह हाच राहिल असेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.प्रमोद जठार दलाल  त्यांच्याबद्दल काय बोलणार खासदार म्हणून माझी भुमिका जनतेला अभिप्रेत अशीच असेल मला जमिनीची दलाली करायची नाही आणि दलाली वर माझे घर चालत नाही माजी आमदार प्रमोद जठार दलाल आहेत. गुजराती लोकांची  दलाली करून जमिनी विकल्या असा आरोप राऊत यांनी जठारावर केला आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीVinayak Rautविनायक राऊत