शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आले कोकणातील मायभूमीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:47 IST

वराडकरांनी केले जंगी स्वागत; गावकऱ्यांनी मालवणी बोली भाषेत केला जयघोष; सुवासिनींनी ओवाळल्या पंचारती

मालवण : भारतात मी याआधी पाचवेळा आलो आहे. मात्र माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आयर्लंडचेपंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड (ता. मालवण) येथे व्यक्त केला.शासकीय पातळीवर दौºयाचे आयोजन न करता घरगुती स्तरावर पंतप्रधान लिओ वराडकर यांचा खासगी दौरा होता. कोणत्याही शासकीय यंत्रणेला दौºयाची कल्पना नव्हती, असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान वराडकर यांनी गाडीतून उतरताच भारतीय पद्धतीने उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी गावकऱ्यांनीही मालवणी बोली भाषेत जयघोष करत स्वागत केले. सुवासिनींनी पंचारती ओवाळल्या. अगदी लहानांपासून थोरांनी वराडकर यांना गराडा घातला. डॉ. लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आईमेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित आहे.डॉ. लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विध्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली.भारतात गेल्या २५ वर्षांत येथील विकासाचा वेग वाढला आहे.दोन्ही देशांत अधिक चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्यासोबत सेल्फी व फोटो काढत होते. कोणताही मोठेपणा न ठेवता वराडकर सर्वसामान्यात मिसळत होते. यातून त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसून आली.देवाच्या प्रार्थनेत मोठी शक्ती२०१७ साली मी आयर्लंडचा पंतप्रधान झालो. यावेळी वराड गावात ग्रामस्थांनी माझ्यासाठी देवालयात प्रार्थना केली. मी धार्मिक नाही मात्र मला कल्पना आहे, की प्रार्थनेत मोठी शक्ती असते.- डॉ. लिओ वराडकर, पंतप्रधान, आयर्लंड

टॅग्स :Irelandआयर्लंडprime ministerपंतप्रधान