शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना विमा

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : दीड हजार लोकांना मिळणार लाभ

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळपीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. १,६४४ बागायतदारांना विमा लाभांश मिळणार आहे.शासनाकडून फळपीक विमा योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत उच्चतम तापमान, कडाक्याची थंडी तसेच अवेळचा पाऊस आदी निकष जारी करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. शिवाय आॅक्टोबरमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस इतके तापमान काही ठिकाणी नोंदविण्यात आले. आंबा पिक विम्याचा कालावधी १ जानेवारीपासून सुरु होतो. फेब्रुवारी महिन्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तत्पूर्वी १,६४४ बागायतदारांनी जिल्ह्यातील १,५७३.८६ हेक्टरवरील आंबा बागांचा विमा उतरवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ९४ लाख २७ हजार ७०४ इतका प्रिमीअम भरला आहे. किनारपट्टीच्या १५ किलोमीटर आतील भागात ३७.५ अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून १५ किलोमीटर बाहेरील बाजूला ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाला विम्याचा लाभ मिळणार होता.जानेवारी ते मार्च ५ मि.मी. पेक्षा अधिक व मार्च ते ३१ मेपर्यंत १० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास लाभ मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार ७१८.३० हेक्टर आंबा आणि काजूचे ११ हजार ९६.४१ हेक्टर इतके नुकसान झाले आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांचे ३१ हजार ८१४.६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी १२ प्रमाणे ४९ कोटीचा निधी अपेक्षीत असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे. शासनाकडून नुकसान भरपाई अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हेक्टरी १२ हजार प्रमाणे निधी अपेक्षीत आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये फळपीक विमा योजना सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गतवर्षी उच्चतम तापमानामुळे काही बागायतदारांना लाभ मिळाला होता. परंतु किनारी भागातील उच्च तापमान न नोंदविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्याने विमा योजनेमुळे काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे बागायतदार चांगलाच वैतागला आहे. विम्याची भरपाईही वेळेत मिळत नसल्याची बोंब बागायतदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान झाल्याने बागायतदार सध्या मेटाकुटीस आले आहेत.