शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

सिंधुदुर्गनगरीत लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये तपासणीस प्रारंभ

By admin | Published: April 17, 2017 5:48 PM

सुविधेचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी : दि. १६ : लाईफ लाईन एक्सप्रेस रेल्वेमध्ये वीस विशेष तज्ञ डॉक्टराचे पथक कार्यरत आहे. स्तनांच्या व मुख कॅन्सरचे पुर्व निदान, दंतोपचार कानाचे आजार, आथोर्पेडीक शस्त्रक्रिया, डोळे तपासणी अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया या लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये केल्या जाणार आहेत. या आरोग्य सुविधांचा सिंधुदुर्गनगरीतील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित लाईफ लाईन एक्सप्रेस उद्घाटनप्रसंगी केले.केंद्रीय रेल्वेमेंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गनगरी, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या तीन ठिकाणच्या लाईफ लाईन एक्प्रेस सुविधेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरसींगव्दारे केले. सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमास माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अवधुत मालंडकर, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने सिंधुदुर्गात प्रथमच लाईफ लाईन एक्सप्रेसचे आगमन होत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबाबत आभार मानून जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, सिंधुदुर्गात विशेषत: महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर याची पूर्व तपासणीची सोय नाही. पण या लाईफ लाईन एक्सप्रेसमुळे ही सुविधा मोफत उपलब्ध झाली याचा लाभ विशेषत: महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले की, या लाईफ लाईन एक्सप्रेस सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र, उप जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील इच्छुक रुग्णांना या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर पूर्व निदानासाठी आवश्यक असलेला मॅनोग्राफी हे यंत्र या एक्सप्रेसमध्ये उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने इच्छुक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. लाईफ लाईन एक्सप्रेसव्दारे तीन दिवसाची ही आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोहीम यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी संदेश पारकर, अतुल काळसेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. लाईफ लाईन एक्सप्रेसचे प्रकल्प अधिकारी डॉ. याज्ञिक वझा यांनी रत्नागिरी येथील रेल्वेच्या मुक्कामात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा हजार रुग्णांची तपासणी तर ६00 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती यावेळी दिली. प्रारंभी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी.बी.निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.