शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बांदा-डेगवे रस्त्याची पाहणी, त्वरित डागडुजीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:47 IST

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा ते डेगवे रस्त्याची पाहणी केली.

ठळक मुद्देआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अधिकारी रस्त्यावरसार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उडाली

बांदा : बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा ते डेगवे रस्त्याची पाहणी केली.यावेळी त्यांनी ग्रामस्थांना रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. रस्त्याची तत्काळ डागडुजी न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरपंच अक्रम खान व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला.

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून वाहने चालविणे तारेवरची कसरत आहे. मात्र, संबंधित विभागाला जाग काही येत नाही. वेळोवेळी बांधकाम खात्याला निवेदने देऊन, घेराव घालूनही जाग न आल्याने याविरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते.

यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, बांदा तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, डेगवे सरपंच प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधु देसाई, माजी सरपंच बाळा आकेरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकरंद तोरस्कर, संजय विर्नोडकर, दत्तप्रसाद स्वार आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गroad safetyरस्ते सुरक्षाbanda-pcबांदा