ॉसावंतवाडी: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊ गर्दी झाली आहे. विधानसभा निरीक्षक जयप्रकाश ठाकूर यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुकांची यादी घेऊन लवकरच तीन उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे सावंतवाडीतून असून आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघाला भाजपची जागा मिळावी, असा दावा यावेळी करण्यात आला. येथील आदिनारायण मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी विधान सभा निरीक्षक जयप्रकाश ठाकूर, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नूतन जिल्हा उपाध्यक्ष हरिश पाटील, माजी आमदार अजित गोगटे, विद्या ठाकूर, संजय यादव, एस. टी. सावंत, विजय मराठे, राजन म्हापसेकर, शाम काणेकर, मंदार कल्याणकर, सीमा जंगले, राजू राऊळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ठाकूर म्हणाले की, वरिष्ठ पातळीवरून उमदेवार कोणताही दिला, तरी सर्व जणांना मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयाची अतिशयोक्ती न बाळगता विधानसभा निवडणूक एक जुटीने काम करणे आवश्यक आहे. विधान सभा निवडणुकीला मोदी लाट म्हणणे हे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीची स्थिती वेगळी आहे, असे मार्गदर्शन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आमदार जठार म्हणाले, नारायण राणेंसारख्या दहशतवादी प्रवृत्तीचा पराभव २००९ साली कणकवली मतदार संघातून भाजपने केला होता. एवढी दहशत असूनही मी आमदारकी निवडणूक लढवून दाखविली होती. असा टोलाही जठार यांनी लगावला. (वार्ताहर)सावंतवाडीतून सर्वाधिक इच्छूक यावेळी ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांची यादी घेतली. यामध्ये कणकवली मतदार संघातून प्रमोद जठार, प्रमोद रावराणे, कुडाळ मतदार संघातून राजू राऊळ, बाबा मोंडकर, बब्रुवान भगत, गजा वेंगुर्लेकर, विलास हडकर, प्रभाकर सावंत, चारू देसाई, अभय सावंत, तर सावंतवाडी विधानसभेसाठी इच्छुक राजेंद्र म्हापसेकर, अतुल काळसेकर, सुषमा प्रभूखानोलकर, स्मिता आठलेकर, चंद्रशेखर देसाई, प्रकाश रेगे, संजय गावडे, शाम काणेकर, नेत्रा मोळीये, श्वेता कोरगावकर आदी इच्छुक आहेत. असे मिळून जिल्ह्यातून २० जण भाजपसाठी इच्छुक आहे. या सर्व इच्छुकांची यादी आज निरीक्षक जयप्रकाश ठाकूर यांनी घेतली आहे. जिल्ह्यातून विधान सभेसाठी तिन्ही उमेदवार हे भाजपचे मिळावे, असा दावा भाजपने या बैठकीत घातला आहे.क ोणी घर देता का? नारायण राणेंची स्थिती आता ‘कोणी घर देता का?’ अशी झाली आहे. त्यामुळे आता त्यांना मुंबई समुद्रात वेगळे बेट निर्माण करा आणि राज्य द्या, असा टोला जठार यांनी नारायण राणेंना लगावला. या बैठकीत तुळशीदास गावडे यांना युवा मोर्चा वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष पद जाहीर करण्यात आले.
सावंतवाडीच्या जागेसाठी आग्रही
By admin | Updated: August 5, 2014 00:03 IST