शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करा

By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST

इन्सुली सूतगिरणीप्रकरण : जनहीत याचिका दाखल

सावंतवाडी : इन्सुली सूतगिरणीबाबत शासनाचे कायदे व शासननिर्णय यांना धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी महसूल बुडविणे, खोटा अहवाल सादर करणे यासह अन्य कारणांसाठी महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासंदर्भात नारायण राजाराम मोरजकर यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे.इन्सुली येथील मे. रत्नागिरी पॉवरलूम को आॅप स्पिनींग मिल लिमिटेड या सूतगिरणीच्या मिळकतीमधून महाराष्ट्र को. आॅप बँक लिमिटेडच्या तारणगहाणची रक्कम, शासनाची थकीत रक्कम, कामगारांचे पगाराची थकबाकी वसूल होण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी यांची अवसायक म्हणून २00४ साली नेमणूक करण्यात आली होती. मात्र, अवसायकाची परवानगी न घेताच बँकेने तीनवेळी मे. सत्यम डेव्हलपर्स अँड बिल्डर्सला विक्रीप्रमाणपत्र दिले. यावेळी शासनाच्या थकबाकीची वसुली न करणे, विक्री नोटिशीवर आवश्यक तपशील न दाखवणे आदी बेकायदेशीर कृत्ये करुन लिलाव करण्यात आला. महसूलच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाची १६ कोटी २६ लाख सहा हजार सातशे चौवेचाळीस रुपये थकीत वसुली न करता अनधिकृत बांधकामे कायम करत बिनशेती आदेश दिला.वेळोवेळी याविरोधात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्यम बिल्डर्सला जाणीवपूर्वक अभय देत सूतगिरणीच्या मिळकतीचे रेखांकन, अनधिकृत गौणखनिज उत्खनन कायम करण्यास आपले अभिप्राय हरकती प्रलंबित असतानाही बेकायदेशीररित्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांनीही लिलाव कायदेशीररित्या झाल्याचा अहवाल दिला. मात्र, याच अहवालात शासनाची परवानगी घेतली नसल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.त्यामुळे शासनाचे कायदे व शासननिर्णय यांना धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी महसूल बुडविणे, खोटा अहवाल सादर करणे, लिलावाचा बेकायदेशीर अहवाल बनविणे, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे आदी बाबींची चौकशी करुन संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांचीही चौकशी करुन कारवाई करण्याची विनंती या जनहीत याचिकेव्दारे उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. या जनहीत याचिकेत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, अवसायक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सावंतवाडी, महाराष्ट्र स्टेट को. आॅप बँक लि. व मे. सत्यम डेव्हलपर्स यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. याप्रकरणी सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे. (प्रतिनिधी)