शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा :दुर्वा खानविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:18 IST

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.

ठळक मुद्देअंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा :दुर्वा खानविलकर निकृष्ट पोषण आहार पुरविल्याचा आरोप; पंचायत समितीची सभा यशस्वी

वैभववाडी : शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीची सभा झूम अ‍ॅपवर झाली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांची आॅनलाईन उपस्थिती होती.तालुक्यातील अंगणवाड्यांमार्फत लहान बालकांच्या पोषणासाठी आहार दिला जातो. यामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, तेल आदींसह विविध वस्तूंचे कीट असते. परंतु सध्या दिला गेलेला आहार हा निकृष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानविलकर यांनी केली. यावेळी महिला बालविकास विभागाच्यावतीने चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.कोरोनाच्या काळातील वीज बिले वाढीव आली आहेत. या बिलांमध्ये ग्राहकांना काही सवलत मिळणार आहे का? असा सवाल करीत वीज बिले भरायची की नाहीत? अशी विचारणा सदस्य रावराणे यांनी केली. त्यावेळी उपअभियंता जयकुमार कथले यांनी शासनाकडून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचा विमा आहे. त्यांना भरपाई मिळणे आवश्यक आहे. कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली? असे रावराणे यांची विचारले असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे स्पष्ट केले.ओरोस येथून अहवाल येण्यास विलंबकोविड सेंटर आणि विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही ठिकाणी अस्वच्छता आहे. वेळोवेळी सांगूनही त्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. याशिवाय तालुक्यातील कोरोना अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. नवनाथ कांबळे यांनी कोविड सेंटरमध्ये दररोज स्वच्छता केली जाते. कोरोना तपासणीसाठी घेतलेले स्वॅब इथून वेळेत ओरोसला जातात; परंतु तेथूनच अहवाल येण्यास विलंब होतो. ओरोस लॅबमध्ये रुग्ण आढळल्याने हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामसेवकाला नोटीस द्यावी : रावराणेतालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७० असून सक्रिय रुग्णांची संख्या ३९ आहे. ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सभेत दिली. तिरवडेतर्फ सौंदळ सरपंचांना विलगीकरणावरून झालेल्या त्रासाला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्या ग्रामसेवकाला नोटीस द्यावी, अशी मागणी रावराणे यांनी केली.कुसूर येथील अतिक्रमण हटवाकुसूर बाजारवाडी येथून मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीकडे जाणारा मार्ग जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र, त्या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने रहदारीस बंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी अरविंद रावराणे यांनी सभेत केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfoodअन्न