शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

आंब्यावर ‘फांदीमर’चा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 8, 2016 23:37 IST

बागायतदार चिंतेत : पावसाचे पाणी मुळाशी साचल्याचा परिणाम

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न होता असे पाणी बऱ्याचअंशी झाडांच्या मुळाजवळ साठून राहते. त्यामुळे मुळे कुजून झाडाच्या फांद्या टोकाकडून वाळल्याने कातळ, कातळसदृश जमिनीवरील आंबा बागांमध्ये ‘फांदीमर’ या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे आंबा बागायतदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. फांदी सुकणे, साल काळी पडणे, डिंकासारखा चिकट द्र्रव येऊन फांदी पूर्ण वाळणे ही फांदीमर या रोगाची लक्षणे आहेत. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राकडून या रोगावर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. उपाययोजना अशा, फांंदीमर रोगाची लक्षणे दिसल्यास बागायतदारांनी प्रादुर्भित भागाच्या खाली तिरकस काप देऊन फांदी कापावी व त्यावर बोेर्डोपेस्ट किंवा कॉपर आॅक्झिक्लोराइड पेस्ट त्वरित लावावी व रोगग्रस्त फांद्यांचा त्वरित नायनाट करावा. तसेच पावसाचा अंदाज घेऊन पूर्ण झाडावर एक टक्का बोर्डोमिश्रण किंवा कार्बेन्डिझीम एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॉपर आॅक्झिक्लोराइड तीन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. खोडातून डिंक येत असल्यास तो भाग पटाशीने तासून त्यावर बोर्डोपेस्ट लावावी. अशा बागांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेणखताबरोबर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीचा वापर २०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात करावा. तसेच बऱ्याच वेळा झाडाला बोरॉन, झिंक अशा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास फांदीमधून डिंक येण्याची लक्षणे दिसून आल्यास डोलोमाईटचा वापर दोन किलो प्रतिझाड याप्रमाणे केल्यास डिंक येण्याचे प्रमाण कमी होते. (प्रतिनिधी) काही आंबा बागांमध्ये खवले किडीचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एवढ्या जास्त पावसात ही कीड बागेमध्ये टिकून आहे. खवले किडीचे दोन प्रकार आढळतात. या किडीच्या नियंत्रणासाठी पावसाची उघडीप बघून अ‍ॅसफेट पावडर एक ग्रॅम प्रतिलिटर किंवा क्लोरोपायरिफॉस २0 ई.सी. व डायक्लोरोव्हॅस ७0 ई. सी. एक मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात झाडावर फवारणी करावी. - डॉ. पी. सी. हळदवणेकर संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र