शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कुबलने वापरलेली इंडिका कार जप्त

By admin | Updated: July 20, 2014 22:15 IST

चिपळूण पोलिसांचा तपास : मंत्र्यांचा पीए असल्याचे भासवून अनेकांना गंडा

सावंतवाडी : वेंगुर्ले उभादांडा येथील विकास कुबल याने गृहमंत्र्याचा पीए असल्याचे भासवत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार चिपळूण येथे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी अनेकांना गंडा घालण्यासाठी कुबल याने वापरलेली इंडिका कार रविवारी सावंतवाडीतून जप्त केली आहे. तसेच गोव्यातील एका व्यक्तीच्या पाळतीवर चिपळूण पोलीस आहेत.दरम्यान, विकास कुबल याचा जास्तीतजास्त वावर हा सावंतवाडीत होता. तसेच गृहमंत्र्याचा सचिव असल्याचे सांगत तो अनेकवेळा शासकीय विश्रामगृहावर थांबत असल्याचे आता पुढे आले आहे.याबाबत माहिती अशी की, गृहमंत्र्याचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत विकास कुबल याने कोकण पट्ट्यात अनेकांना गंडा घातला होता. त्याचे बिंग अलिकडेच चिपळूण पोलिसांनी उघड केले. चिपळूण येथील एकाला नोकरीचे अमिष दाखवून तब्बल अडीच लाख रूपये त्याने उकळले होते. पण त्याला नोकरी लागली नाही. या तक्रारीनंतर कुबल यांच्या मुंबईतून मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर एक- एक प्रकरण आता बाहेर पडू लागले आहे.विकास कुबल यांची पूर्ण कोकणात मोठी बडदास्त होती. तो सावंतवाडी, वेंगुर्ले आदी ठिकाणी साहेबासारखा वावरत असे. स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून त्याने अनेकांना जमीन व्यवहार करूया तसेच नोकरी लावतो, माणसे घेऊन या, असे तो सांगत असे. त्यातून त्याची अनेकांशी ओळख होत गेली. सावंतवाडीत आला की, त्याला भेटण्यासाठी बरेचजण यायचे. त्याचे शासकीय विश्रामगृहातील बुकिंग ही मुंबईतून होत असे. त्यामुळे स्थानिक अधिकारी त्याला दचकून रहात असत. चिपळूण पोलिसांनी त्याला दोन दिवसापूर्वी मुंबई येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा बडेजाव आता समोर येऊ लागला आहे. तो जी इंडिका कार वापरत होता, ती कारही चिपळूण पोलिसांनी सावंतवाडीतून जप्त केली असून येथील सावंत नामक गॅरेजमध्ये पोलिसांनाही कार आढळून आली आहे. ही कार दुरूस्तीसाठी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर पोलिसांनी विकास कुबल यांच्यासोबत गोव्यातील सत्यवान नामक तरूण असे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून तो अद्याप पोलिसांना सापडला नाही.रविवारी दुपारी चिपळूण पोलिसांचे एक पथक गोव्यात गेले होते. तसेच दुपारी ते सावंतवाडीत दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत जास्त माहिती न देता ही कार चिपळूणकडे नेण्यात आली आहे. कुबल याने फसवणूक केली आहे, असे सांगणारी एकही तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. तक्रार आली तर त्यांची चौकशी करू, असे ही यावेळी चिपळूण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.कार सावंत नामक गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आली होती. त्याला ही कार चोरीची आहे, याची कल्पना नव्हती. रविवारी चिपळूण पोलीस थेट गॅरेजमध्ये आल्यावर याबाबतचे बिंग फुटले. त्यामुळे या कारवर १८ हजारांचा खर्च करण्यात आला होता. तो खर्च आता कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)