शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

माथाडी कामगारांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात, आठ वर्षांचा महागाई भत्ता रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:33 IST

labor, collcator, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील महागाई भत्तावाढीच्या फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाम माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देआठ वर्षांचा महागाई भत्ता रखडला रकमेचा आकडा परस्पर ठेकेदाराकडे, अपहाराची शक्यता

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील महागाई भत्तावाढीच्या फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाम माथाडी कामगारांनीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने जिल्ह्यातील सुमारे ७० माथाडी कामगारांनी महागाई भत्ता वाढीतील फरकाची रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने माथाडी कामगारांना देय असलेली महागाई भत्तावाढीतील फरकाची रक्कम माथाडी मंडळाकडे भरणा न करता ती संबंधित ठेकेदाराला अदा केली आहे. या लाखो रुपये रकमेचा ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमताने अपहार केला आहे, असा आरोप करीत याची सखोल चौकशी करून माथाडी कामगारांच्या हक्काची रक्कम माथाडी कामगारांना मिळावी. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.या आंदोलनात माथाडी कामगार संघटनेचे महेश चव्हाण , दशरथ शिंदे (संयुक्त सरचिटणीस), सुनील मयेकर, सदानंद कदम, शंकर गुरव, नारायण शेल्टे, नंदू घाडीगावकर, प्रभाकर घाडीगावकर, सिद्धेश चव्हाण, दिनेश सावंत, राजू फाले आदी पदाधिकार्‍यांसह कामगार सहभागी झाले आहेत.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनीही मंगळवारी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात जाब विचारला जाईल असे आश्वासन देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली.कामगारांनी लक्ष वेधूनही कार्यवाही नाहीमाथाडी कामगारांच्यावतीने दिलेल्या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना या कामगारांनी कोरोना कालावधीत दिवस-रात्र मेहनत करून धान्य वितरणात शासनाला सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही जिल्ह्यातील माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कलावधीतील महागाई भत्तावाढ फरकाची रक्कम माथाडी कामगारांना मिळालेली नाही. याबाबत माथाडी कामगार युनियनच्यावतीने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

टॅग्स :Labourकामगारcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग