शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

निवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:27 IST

road transport Sindhudurg- अर्धवट सोडलेल्या व खड्डेमय असलेल्या म्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी निवती ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत कोणताच निर्णय न झाल्याने हे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनिवती ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरूम्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा

कुडाळ : अर्धवट सोडलेल्या व खड्डेमय असलेल्या म्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी निवती ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत कोणताच निर्णय न झाल्याने हे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा. ठेकेदार काम करत नाही, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे सांगत मंगळवारी निवती येथील १०० ते १५० ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयात उपोषण सुरू केले आहे. निवती ग्रामस्थांनी मागील आठ दिवसांपूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता; परंतु याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी लक्ष न आम्ही निवती ग्रामस्थ उपोषणाला बसलो आहोत. गावातील बऱ्याच लोकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या उपोषणाला सहभाग घेतला आहे, असे निवती ग्रामस्थांनी सांगितले.उपोषणस्थळी कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील, शाखा अभियंता मेस्त्री यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयासमोर पोलीस, होमगार्ड तैनात ठेवले आहेत.

निवती रस्त्याचे बंद अवस्थेतील काम सुरू करा, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा निवती येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत २१ डिसेंबर रोजी कुडाळ येथील मुख्य कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांना दिला होता. निवेदन देऊन काम बंद असलेल्या रस्त्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, या चर्चेदरम्यान कोणतेही काम संबंधित ठेकेदाराने सुरू न केल्याने मंगळवारी निवती ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढत उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला प्रामुख्याने किशोर सारंग, तृप्ती कांबळी, विलास आरोलकर, लक्ष्मण नाईक, उदय सारंग, सुरेश पडते, कांचन पाटकर, अनिल मेतर, वीरश्री मेतर, निलेश वस्त, नागेश सारंग, भारती धुरी, अजित खवणेकर, सुधीर मेतर, रामचंद्र भगत, नमिता घाटवळ हे सर्व निवती ग्रामस्थ, व अन्य ग्रामस्थ कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर हजर होते.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयासमोर निवतीवासीयांनी बेमुदत उपोषण छेडले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक