चिपळूण : अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून, त्यामुळे देशाचे भविष्य अंधारमय आहे. अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. या पैशातून दहशतवाद पोसला जातो. म्हणून पोलीस राज्य उत्पादन शुल्क खाते अॅलर्ट झाले आहे. चिपळूण शहर व परिसरात युनायटेड इंग्लिश स्कूल, सती हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, रिगल कॉलेज, कालुस्ते हायस्कूल, गुरुकुल, माता रमाई महाविद्यालय, डी. बी. जे. महाविद्यालय, नॅशनल हायस्कूल, मिरजोळी, परांजपे मोतीवाले हायस्कूल, एसपीएम भोगाळे, बांदल हायस्कूल, शिवाजीनगर एस. टी. स्टॅण्ड या परिसरात मुक्तांगण मित्र, पुणे व गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे पथनाट्य सादर करण्यात आले. या जनजागरण मोहिमेमुळे समाजात वाढलेली व्यसनाधिनता व त्यातून निर्माण होणारा दहशतवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी पथनाट्य, लघुपट, प्रश्नोत्तरे, अनुभव कथन असे कार्यक्रम झाले. चिपळूणचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह आंधळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस नाईक पप्या चव्हाण यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. चिपळूण तालुक्यात अंमली पदार्थ बाळगण्यापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जसे प्रयत्न सुरू केले आहेत, तसे या प्रयत्नाना नागरिकांनी व महाविद्यालये, हायस्कूल्स यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. या सामुहिक प्रयत्नातून अशा व्यसनाधिनतेपासून तरूण पिढीला दूर ठेवणे शक्य होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उत्पादन शुल्कची भूमिका महत्त्वाचा आहे. (प्रतिनिधी)पैशातून दहशतवाद पोसला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच राज्य पोलीस उत्पादन शुल्क खाते अलर्ट झाले आहे. हायस्कूल पातळीवर आता हे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अंमली पदार्थ विक्रीतून वाढतोय दहशतवाद
By admin | Updated: July 24, 2014 22:45 IST