शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकिसरेतील युवासेनेच्या मेळाव्यात सभासद नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:53 IST

Shivsena, Viabhawadi, Sindhudurgnews शासनाच्या योजना गावागावातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे युवा सेना शाखा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी येथे केले.

ठळक मुद्देकोकिसरेतील युवासेनेच्या मेळाव्यात सभासद नोंदणीचा शुभारंभगाव तेथे युवा सेना शाखा निर्माण करणार :रुपेश कदम

वैभववाडी : भविष्यातील राजकारणात तरुणांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जनहिताच्या योजना राबवित आहे. त्यामुळे शासनाच्या योजना गावागावातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे युवा सेना शाखा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी येथे केले.कोकिसरेतील श्री माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात युवासेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला विस्तारक अमित पेडणेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, राजू राठोड, जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, रोहित पावसकर, जयराज हरयाण, सागर मेजारी, तुषार शिंदे, सिध्देश कडू, विक्रांत पवार, वैभव सुतार, सुशांत म्हसकर, योगेश गोठणकर, विठोबा गुरव आदी उपस्थित होते.कदम पुढे म्हणाले की, पुढच्या काळात राजकारणात युवा पिढीची भूमिका खूपच महत्त्वाची राहणार आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी युवा पिढीतून तयार होणार आहेत. त्यामुळे तरुणांनी राजकारणासोबत सामाजिक कार्यासाठी पुढे यायला हवे. युवा सेनेच्या माध्यमातून राज्यात सध्या बूथ तेथे युथ हे अभियान राबविले जात आहे.

तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वैभववाडी महाविद्यालयात युवासेना युनिटची स्थापना करण्यात आली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात राज्य सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी