शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणीने केली लाखोंची फसवणूक, दोडामार्ग तालुक्यात खळबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 28, 2023 18:27 IST

संबंधित तरुणीने पोलिसांना स्वतःला संरक्षण देण्याचा केला अर्ज 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रोख रक्कम उकळून त्यांची लाखोंची फसवणूक करण्याचा प्रकार दोडामार्ग तालुक्यात उघडकीस आला आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारी तालुक्यातीलच एक तरुणी असल्याचे बोलले जात आहे. काही वर्षांपूर्वी तालुक्यात शेअर्स मार्केटच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला होता.त्यांनतर बऱ्याच वर्षांनी फसवणुकीचे हे नवे प्रकरण उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसात फायनान्स कंपन्यांकडून लाखोंची कर्जे मिळवून देण्याची बतावणी करून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रक्कम घेऊन नंतर त्यांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असाच प्रकार दोडामार्ग तालुक्यात उघडकीस आला आहे.तालुक्यातील ऐका गावातील तरुणीने एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे सांगून गरजू कर्जदारांकडून फी स्वरूपात रक्कम घेतली. पाच लाख रुपयांचे कर्ज हवे असल्यास ४२ हजार फी ची रक्कम अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फी म्हणून लाखो रुपये अनेक गरजू कडून घेतले. कमी कालावधीत आणि विना कटकटीशिवाय कर्ज मिळणार या आशेने या कर्जाच्या भोवऱ्यात अनेकजण अडकले आणि सुरुवातीची प्राथमिक फी म्हणून रक्कम जमा केली. मात्र रक्कम जमा केल्यानंतर अनेक दिवस उलटले तरी कर्ज मिळत नसल्याने संबंधित तरुणीकडे फी स्वरूपात रक्कम देणाऱ्या गरजूनी विचारणा केली असता तिच्याकडून तारीख पे तारीख देण्यात आली. मात्र कर्ज काही मिळाले नाही. त्यामुळे आपली या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच गरजूंच्या पायाखालची वाळूच सरकली.फसवणूक झालेल्या सर्वांनी एकत्र येत संबंधित तरुणीच्या घरी जात याबाबत जाब विचारला असता तिने आपण ही रक्कम अन्य एका व्यक्तीकडे दिल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.एवढ्यावरच त्या तरूणीने न थांबता पोलिस ठाणे गाठून स्वतःला संरक्षण देण्याचा अर्ज देखील पोलिसांना दिला असून फसवणूक झाल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांचीच तक्रार केली आहे.दरम्यान फसवणूक झालेल्या गरजू कर्जदारांनीही पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे‌. परंतु तरीही या तक्रारीवर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याची चर्चा आहे. उद्या या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिस प्रशासन या प्रकरणाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते यावरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास अवलंबून असणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfraudधोकेबाजी