शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती गणपतींचे विसर्जन; जयघोषच्या गजरात लाडक्या बाप्पाला दिला निरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 5, 2022 19:17 IST

काही गणपतींचे सातव्या दिवशी, नवव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरया…!! पुढच्या वर्षी लवकर या…!! असा जयजयकार करीत ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गौरीगणपती विसर्जनाच्या सहाव्या दिवशी लाडक्या गणेश भक्तजनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला व गौराईला निरोप दिला.सोमवारी सहाव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन असल्यामुळे तालुक्यातील विविध गावामधुन गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी महिलांनी गौराईचे विधीवत पुजन करून व गणरायासमोर महाआरत्या करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयजयकार करीत सहाव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी ३१ ऑगस्टला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.यानंतर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गौरी गणपती असल्याने या गौरीचे रविवारी आगमन झाले. तर सहाव्या दिवशी मोठया उत्साहात भक्तीमय वातावरणामध्ये गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर काही गणपतींचे सातव्या दिवशी, नवव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.विशेषतः करुन अनंत चतुर्दशी दिवशी तालुक्यातील बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.काही किरकोळ प्रमाणात तालुक्यातील २१ दिवसांच्या गणपतींचे देखील विसर्जन करण्यात येते.मिठमुंबरी समुद्रकिनारी गौरी गणपतींचे मोठया उत्साहात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी जय घोषणा देत देवगड बंदर, आनंदवाडी, किल्ला, कुणकेश्वर, वाडातर, मोंड, मिठबांव, मुणगे आदी खाडीकिनारी व समुद्रकिनारी भागात वाजतगाजत, फटाक्यांच्या आतीषबाजीत लाडक्या गणरायाला व गौराईला निरोप देण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव