शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खनन, महसूलची धडक कारवाई; वाळू तस्कर पळाले 

By अनंत खं.जाधव | Updated: September 30, 2023 15:25 IST

महसूल विभागाने रॅम्पसह होडी जाळली 

सावंतवाडी : तेरेखोल नदीपात्रातील भागात खाडीलगत आरोंदा सावरजुवा येथे बेकायदा वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते. यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्यासह पोलीस पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. यावेळी वाळू उपसा करणारे गोवा हद्दीत पळून गेले मात्र जागेवर असलेला वाळू रॅम्प सह साहित्य महसूल विभागाने जाळून टाकले. या कारवाईने वाळू तस्कराचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.तेरेखोल नदी पात्रातील आरोंदा सावरजुवा येथे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल व पोलीस यानी संयुक्त मोहीम राबवली यात एक होडी वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ यंत्रणेने वाळू उपसा करणाऱ्या होडीचा पाठलाग केला असता  वाळू तस्करी करणारे गोवा हद्दीत पळून गेले. गोवा हद्दीतील वाळू तस्करी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या होडीसह पलायन केले. मात्र वाळू उपसा करणारे साहित्य ते महाराष्ट्र हद्दीत टाकून पळाले.महसूल विभागाकडून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच वाळू रॅम्प व इतर साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. ही कारवाई सकाळी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाणोली तलाठी भाऊसाहेब चितारे, आरोंदा तलाठी पोले, आरोंदा उपसरपंच  सुभाष नाईक, आरोंदा कोतवाल जाधव व पोलीस कर्मचारी दळवी यांनी केली आहे.मेरीटाईम बोर्डाने लक्ष देणे गरजेचेतेरेखोल नदीपात्रात परवानगी नसताना होडी कशा काय उतरतात याबाबत मेरीटाईम बोर्डाने याकडे लक्ष देऊन पाण्यात उतरणाऱ्या होडी व बोटी यांना परवानगी आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि अशी जर तपासणी मेरीटाईम बोर्डाने केली तर निश्चितपणे अनधिकृतपणे वाळू तस्करी करणाऱ्याना आळा बसेल. असे स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग